*15 ते 20 हजार मताधिक्याने कमळ फुलणार मुंदडा समर्थकाचा तर 20 हजाराने तुतारी वाजणार साठे समर्थकांचा दावा*
*सौ नमिता अक्षय मुंदडा व पृथ्वीराज साठे या दोघासह 25 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद*
केज (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीच्या सौ नमिता अक्षय मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे या दोघासह 25 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून केज मतदार संघात 15 ते 20 हजार मताधिक्याने पुन्हा एकदा कमळ फुलणार असा दावा मुंदडा समर्थक करत असताना 20 हजाराने तुतारी वाजणार असा दावा साठे समर्थक करत आहेत.
केज विधानसभा मतदार संघात लोकशाहीचा उत्सव असलेली निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली.
मतदार संघात नोंदल्या गेलेल्या एकूण 387221 मतदात्या पैकी 130854 पुरुष आणि 114943
महिला, ईतर 2 अशा एकूण 245799 म्हणजेच टक्केवारी नुसार 63.48 टक्के मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून अंबाजोगाई शहरात नोंदल्या गेलेल्या 66465 मतदारा पैकी 41735 मतदारांनी म्हणजे 62.79 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची नोंद हाती आली आहे.
केज मतदार संघतील भाजप महायुतीच्या सौ नमिता अक्षय मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे या दोघासह 25 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून केज मतदार संघात 15 ते 20 हजार मताधिक्याने पुन्हा एकदा कमळ फुलणार असा दावा मुंदडा समर्थक करत असताना 20 हजाराने तुतारी वाजणार असा दावा साठे समर्थक करत आहेत. त्यामुळे आज तरी मतदार संघाचा निकाल काय असेल ते 23 नोव्हेंबर रोजीच हाती येणार आहे.
Post Views: 342