Wednesday, May 21, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

लाखो ग्राहकांची कोठ्यावधी रुपयाला फसवणूक करणारे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सर्व्हेसर्वा सुरेश कुटे यास अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायाल्याने सुनावली 5 दिवसाची पोलीस कोठडी 

लाखो ग्राहकांची कोठ्यावधी रुपयाला फसवणूक करणारे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सर्व्हेसर्वा सुरेश कुटे यास अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायाल्याने सुनावली 5

दिवसाची पोलीस कोठडी

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   गेली 2 वर्षा पासून गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टी स्टेट घोटाळ्याचे सर्वे सर्वा सुरेश कुटे यास आज अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्या नंतर न्यायमूर्ती श्रीमती घरत मॅडम
यांनी त्यास 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
     या विषयी प्राप्त माहिती अशी की, केवळ बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील लाखो ठेवी दाराना हजारो कोठी रुपयाला चुना लावुन गोर गरीब ठेवीदारांचे संसार उध्वस्त करणारे ज्ञानराधा मल्टी स्टेटचे सर्वे सर्वा सुरेश कुटे याच्या विरुद्ध राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये फसवणूकीचे गुन्हे दाखल असून आंबजोगाई शहर पोलिसात या संदर्भात पाटबंधारे विभागाचे सेवा निवृत्त अभियंता लक्ष्मण गोरे यांनी आपली  95 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची  तक्रार दाखल केली होती. शिवाय अंबाजोगाई शहर पोलीसात एकूण 57 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्या संदर्भात विविध ठेवीदारांनी गुन्हे दाखल केले असून आज बीड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सुरेश कुटे उपाध्यक्ष कुलकर्णी सह 4 आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायलय क्रमांक 2 च्या न्याय मूर्ती श्रीमती घरात मॅडम यांच्या कोर्टात हजर करण्यात आल्या नंतर सरकार पक्षा तर्फे 7 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली असता  न्यायमूर्तीनी सुरेश कुटे यास 29 मार्च पर्यंत
पोलिस कोठडी सुनावली. या वेळी सरकार पक्षा तर्फे ऍड एल व्ही फड तर सुरेश कुटे यांच्या वतीने ऍड अजित लोमटे यांनी बाजू मांडली.
     दरम्यान सुरेश कुटे यास अंबाजोगाई कोर्टात हजर करणार असल्याची माहिती वाऱ्या सारखी पसरल्याने ठेवीदारांनी न्यायालय परिसरात एकच गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!