Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली! 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ, मोठा धक्का 

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली! 7 आमदारांनी सोडली अजितदादांची साथ, मोठा धक्का 

मुंबई 

   नागालँडमधील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) तब्बल 7 आमदार थेट सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये (NDPP) विलीन झाले आहेत.

या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून, नागालँडमधील त्यांचे विरोधी पक्ष म्हणून असलेले बळ अचानकपणे कमी झाले आहे. हे सात आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले असून, सरकारची बहुमताची स्थिती आणखी मजबूत झाली आहे.

7 NCP MLAs Leave Ajit Pawar

2023 च्या निवडणुकीत NCP ने 12 जागा जिंकून राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु, सत्ताधारी पक्षात या आमदारांच्या प्रवेशामुळे NDPP ची सदस्य संख्या 25 वरून थेट 32 वर पोहोचली आहे.

विधानसभा अध्यक्षांची मान्यता

राष्ट्रवादीच्या या सात आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे विलिनीकरणासाठी अधिकृत पत्र सादर केले होते. अध्यक्षांनी हे विलीनीकरण 10 व्या अनुसूचीनुसार वैध ठरवले असून, संबंधित बदल विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

NDPP ने घेतले ‘ते’ आमदार

सत्ताधारी पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये नामरी नचांग, के. ए. पोंगशी फोम, पिक्टो शोहे, वाई म्होनबेमो हम्त्सो, वाई मनखाओ कोन्याक, के. एस. तोइहो येप्थो यांचा समावेश आहे. NDPP प्रवक्त्यांनी सांगितले की, या विलिनीकरणामुळे नेफ्यू रिओ सरकार आता पूर्ण बहुमताच्या आणि स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!