स्वा रा ती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता व लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्याने क्ष किरण विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला तब्बल 15 वर्षा नंतर मिळाली परवानगी
स्वा रा ती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता व लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्याने क्ष किरण विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला तब्बल 15 वर्षा नंतर मिळाली परवानगी
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
स्वा रा ती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता व लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्या मूळे क्ष किरण विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला तब्बल 15 वर्षा नंतर परवानगी मिळाली असून भविष्यामध्ये स्वा रा तिचा क्ष किरण विभाग सक्षम बनवून रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.
मागील अनेक वर्षापासून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष किरन विभागात तज्ञ डॉक्टर्स व तंत्रज्ञ नसल्यामुळे रुग्णांची एक्स-रे काढणे सोनोग्राफी करणे सिटीस्कॅन करणे आणि नव्यानेच दाखल झालेल्या एम आर आय मशीन द्वारे रुग्णांची एम आर आय करणे यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली होती.
क्ष किरन विभागात तज्ञ डॉक्टर्स व तंत्रज्ञ नियुक्त करण्यात यावेत यासाठी मागील पंधरा वर्षापासून आजपर्यंतचे अधिष्ठाता यांच्यासह विद्यमान अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी सततचा पाठपुरावा केला होता यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना अजित दादा पवार, मा ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे, केज मतदार संघाच्या दिवंगत मंत्री कैलासवासी विमलताई मुंदडा, माजी आमदार संगीता ताई ठोंबरे माजी आमदार पृथ्वीराज साठे विद्यमान आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनीही आपला पाठपुरावा चालू ठेवला होता.
दरम्यान स्वा रा ती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्या मूळे क्ष किरण विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला तब्बल 15 वर्षा नंतर परवानगी मिळाली असून या अभ्यासक्रमामुळे क्ष किरण विभागात अधिष्ठाता शंकर धपाटे, प्राध्यापक पाटील मॅडम, सहयोगी प्राध्यापक कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी चार क्ष किरण विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी निर्माण होणार आहेत. याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वा रा ती रुग्णालयात एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एम आर आय, करण्यासाठी येणाऱ्या रुग्णाची मोठी सोय झाली असून भविष्यामध्ये स्वा रा तिचा क्ष किरण विभाग सक्षम बनला जाणार आहे.
