Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतिने योगा दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना दिले  योगाचे धडे 

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतिने योगा दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना दिले  योगाचे धडे 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

    अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतिने योगा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात योग गुरु शरद अडसुळे यांनी पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांना योगाचे धडे दिले. 

     21 जून अंतर राष्ट्रीय योग दीन व योग दिनाचे औचित्य साधून बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शना खाली अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या पुढाकारातून व सामाजिक बांधिलकी डोळ्या समोर ठेऊन व ग्रामीण 

पोलीस स्टेशनचे नाव चांगल्या कार्यामध्ये उल्लेखनीय ठरेल या उद्देशाने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची तब्यत तंदुरुस्त रहावी,  या उद्देशाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    योग दीना निमित्य आयोजित केलेल्या या कार्यक्रमात योग गुरु शरद अडसुळे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांना योगाचे धडे देऊन आपली प्रकृती सदृढ ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. 

या योग शिबिरात स्वतः पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!