Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दा फाश करण्यात आंबेजोगाई ग्रामीण पोलिसांना यश, दोन आरोपी ताब्यात 

डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दा फाश करण्यात आंबेजोगाई ग्रामीण पोलिसांना यश, दोन आरोपी ताब्यात 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   वाहनांच्या डिझेल टाकी मधील डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दा फाश करण्यात
आंबेजोगाई ग्रामीण पोलिसांना यश आले असून या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
   काल मध्यरात्री आंबा साखर कारखाना ते लातूर टी पॉइंट रोडवर असलेल्या कोपले यांच्या पेट्रोल पंपावर तीन जण एका  थांबलेल्या ट्रकच्या डिझेल टॅंक मधील डिझेल चोरत असल्याचे राहुल कोपले यांच्या निदर्शनास येतात त्यांनी या टोळक्यास हटकण्याचा प्रयत्न केला असता या टोळक्याने सोबत आणलेल्या एम एच 02 क्यू 43 69 या स्कार्पियो मधून त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा राहुल कोपले यांनी आंबजोगाई ग्रामीण पोलिसांना खबर देत  त्यांच्या स्वतःच्या गाडीने या स्कार्पिओचा पाठलाग करून आपली गाडी स्कार्पिओला आडवी लावली.
   यावेळी स्कार्पिओ मधील एका आरोपीने खाली उरून आपल्या बनावट पिस्टलच्या साह्याने कोपले यांना धमकावण्याचा प्रयत्न केला दरम्यानच्या काळात घटनेची माहिती मिळाल्यावरून आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनची गाडी घटनास्थळी आली व त्यांनी
धनंजय बालाजी गायकवाड रा दगडवाडी ता जी लातूर व सुनील अण्णा बोटे रा देववाडी ता शिराळा जी सांगली या 2 आरोपीस ताब्यात घेण्यात यश मिळवले तर योगेश गायकवाड रा चराटा जी बीड हा आरोपी त्या ठिकाण हून फरार झाला आहे.
    याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात तीन आरोपीविरुद्ध पेट्रोल पंप चालक राहुल विजयकुमार कोपले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या कडून 3 लाख 87 हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खोकले व प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौधरी हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!