बर्दापूर येथे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त आयुर्वेदीय रोग उपचार शिबीर संपन्न
बर्दापूर येथे ‘डॉक्टर्स डे’ निमित्त आयुर्वेदीय रोग उपचार शिबीर संपन्न
अंबेजोगाई – तालुक्यातील बर्दापूर येथे 1 जुलै ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने भव्य आयुर्वेदीय रोगनिदान शिबिराचे आयोजन डॉ. शरद पतंगे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिक च्या वतीने करण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. शशांक पाठक यांच्या हस्ते धनवंतरी पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शिबिराच्या सुरुवातीला शिबिराचे आयोजक डॉ शरद पतंगे यांचा व इतर डॉक्टरांचा सन्मान संघटनेचे सचिव डॉ. पांडुरंग बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
या शिबिरात अग्निकर्म, विद्धकर्म व रक्तकर्म यासारख्या तात्काळ वेदना शमविणाऱ्या उपचारांचा अवलंब करण्यांत आला. उपचार केल्यानंतर तात्काळ वेदना कमी झाल्यामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले.अंदाजे दोनशे रुग्णांवर या शिबिरात उपचार करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे डॉ. श्रीराम काळे, डॉ.आशिष दरगड, डॉ. मयूर काळेगावकर, डॉ.उमाकांत गाढवे, डॉ. अमोल जोशी, डॉ. राहुल वारोडे ,डॉ. प्रशांत साखरे, डॉ.सचिन कस्तुरे, डॉ.विजय सोमवंशी, डॉ.दीपक फुटाणे, डॉ.देवराव चामनर , डॉ.रविन्द्र बाहेती
डॉ.अनघा पाठक, डॉ.शीतल दरगड, डॉ.अश्विनी कस्तुरे
आणि Pharmacist प्रियांका पतंगे या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. शरद पतंगे यांनी सर्वांचे आभार मानले.
