अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंबासाखरला ऊस गाळपासाठी द्यावा चेअरमन रमेशराव आडसकर यांचे आवाहन
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंबासाखरला ऊस गाळपासाठी द्यावा
चेअरमन रमेशराव आडसकर यांचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा साखर कारखान्यांलाच ऊस गाळपासाठी द्यावा असे आवाहन चेअरमन मा श्री रमेशरावजी आडसकर यांनी कारखाना मिलच्या कॉलम रॅक कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना हा मागील दोन वर्षापासून हंगाम 2023= 2024 व 2024 -2025 पर्यंत बंद स्थितीमध्ये राहिल्यामुळे, व यापूर्वी हा कारखाना भाडेतत्त्वावर मार्च 22 रोजी देण्यात आला होता, परंतु काही तांत्रिक व आर्थिक अडचणीमुळे संबंधित एजन्सीने हा कारखाना दोन वर्षांपूर्वी सोडून दिलेला होता त्यामुळेच विद्यमान संचालक मंडळाने कारखान्याचे चेअरमन माननीय श्री रमेश रावजी आडसकर यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना चालू झाला पाहिजे ही भूमिका घेतल्यामुळे व या अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाने एनसीडीसी न्यू दिल्ली यांनी कारखान्याचे थकीत देणे देण्यासाठी तसेच कारखान्याचा गळीत हंगाम चालू करण्यासाठी व मशिनरीची देखभाल व दुरुस्तीची कामे अद्यावत करण्यासाठी कारखान्याला आर्थिक मदत केली आहे त्यामुळेच एप्रिल 2025 पासून कारखान्याने इंजिनिअरिंग, उत्पादन,अश्विनी प्रकल्प व शेती विभागाचे कामकाज चालू केली आहेत. दिनांक 5जुलै 2025 रोजी मिल विभागाचा मिल फिटिंग चा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन माननीय श्री रमेश आडसकर, व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोदजी जाधव व सर्व कारखान्याचे संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी येणारा गळीत हंगामाची पूर्व तयारी वेळेत करून पाच लाख मॅट्रिक टन ऊस गळापाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने शेतकी विभागात उसाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. येणारा 2025- 26 गळीत हंगामामध्ये कारखान्याचे गाळप 3200 ते 3500 प्रतिदिन गाळप करणे हेच आमच्या संचालक मंडळाचे उदिष्ट असून यापुढे हा कारखाना अधिक कार्यक्षमतेने चालणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद कामगार कारखान्यावर अवलंबून असणारे इतर घटकांना न्याय देणार असल्याचे चेअरमन रमेशरावजी आडसकर यांनी सांगितले आहे. या चालू गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस गाळपास द्यावा असे आव्हान कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांनी केले . याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक डी एन मर्कड व, सर्वश्री संचालक ऋषिकेश आडसकर, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, अशोक गायकवाड, गोविंद देशमुख, राजेभाऊ औताडे, विजय शिनगारे, बालासाहेब सोळंके, मधुकर शेरेकर, अनिल किर्दंत, अॅडव्होकेट लालासाहेब जगताप, अनंत कातळे, विठ्ठलराव देशमुख, शशिकांत लोमटे, मिनाज पठाण, रमाकांत पिंगळे, सुरेश साखरे, कार्यकारी संचालक डीएन मरकड, मुख्य शेतकरी सचिन बागल, वर्क्स मॅनेजर धीरज वाघोले, चीफ इंजिनिअर प्रशांत सोनार,चीफ केमिस्ट गणेश पाटील, सिव्हिल इंजिनियर दत्तात्रेय चिल्लरगे तसेच ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी,कामगार, बहुसंख्येने उपस्थित होते.
