Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

*आर्किटेक शेख आर्शद लिखित इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग हे पुस्तक खा.शरदचंद्र पवार यांना प्रदान* ——————————————- *खा.शरदचंद्र पवारांकडून शेख अर्शद यांचे कौतुक*

*आर्किटेक शेख आर्शद लिखित इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग हे पुस्तक खा.शरदचंद्र पवार यांना प्रदान*
——————————————-
*खा.शरदचंद्र पवारांकडून शेख अर्शद यांचे कौतुक*


——————————————-
*अंबाजोगाई/प्रतिनिधी*
——————————————-
पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले आर्किटेक शेख अर्शद यांनी लिहिलेल्या इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग हे देशाचे नेते खा.शरदचंद्र पवार यांना प्रदान केले. पुस्तक पाहून व काही संदर्भ जाणून घेतल्यानंतर खा.पवार यांनी शेख अर्शद यांचे कौतुक करत हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणा देईल असा आशावाद व्यक्त केला.
आर्किटेक शेख अर्शद हे व्यवसाय सांभाळत साभाळत मुस्लिम समाजामध्ये व विशेषत तरुण पिढीमध्ये येणार्‍या आव्हानांविषयी जनजागृती करुन मुस्लिम तरुणांना एक विकासाचा व प्रगतीचा मार्ग दाखवत आहेत. पीस फाउंडेशन हे सातत्याने इस्लाम आणि मानवता धर्म यावर काम करतो आहे. शिवाय आर्किटेक शेख अर्शद हे सुद्धा प्रबोधनाचे काम करीत आहेत. येणार्‍या काळामध्ये मुस्लिम तरुणांसमोर अनेक आव्हाने आहेत मग त्यात धार्मिक असतील, व्यावसायिक असतील, शैक्षणिक असतील अशा आव्हानांना कश्या पद्धतीने तोंड द्यायचे आणि त्यातून पुढे कसे जायचे असा मौलिक सल्ला व प्रबोधन या माध्यमातून करत आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जावून ते प्रबोधन करीत आहेत. त्यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेवून इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाची निर्मिती करुन यावर अनेक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला आहे. हे पुस्तक त्यांनी देशाचे जाणते व अनुभवी नेते जे स्वत धर्मनिरपेक्षतेचे राजकारण आणि समाजकारण करीत आहेत. अशा नेतृत्वाला त्यांनी हे पुस्तक भेट दिले आहे. हे पुस्तक पाहिल्यानंतर खा.शरदचंद्र पवार यांनी पुस्तकातील माहिती संक्षिप्त स्वरुपात जाणून घेतला. माहिती जाणून घेतल्यानंतर शरदचंद्र पवार यांनी आर्किटेक शेख अर्शद यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!