Skip to content
दिव्यांगासाठी आयोजित कार्यक्रमास खा बजरंग सोनवणे वगळता सर्वांनी फिरवली पाठ
प्रशासनासह रा कॉ शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना माध्यम प्रतिनिधीचा पडला विसर

अंबाजोगाई
अंबाजोगाई शहरात दिव्यांगासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास खासदार बजरंग सोनवणे वगळता सर्वच रोगप्रतिनिधींनी पाठ फिरवली असून या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही पत्रकारांचा विसर पडू लागला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्हा समाज कल्याण विभाग व एलिम्को, मुंबई या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज अंबाजोगाई पंचायत समितीच्या प्रांगणात दिव्यांग व्यक्तींना व जेष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम साहित्य/साधने वाटप करण्याच्या अनुषंगाने पुर्व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते

या कार्यक्रमास मा.ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, मा.खा.श्री.बजरंग मनोहरराव सोनवणे, मा. खा. रजनीताई अशोकराव पाटील, मा.आ. नमिताताई अक्षय मुंदडा, मा.आ.धनंजय पंडीतराव मुंडे, आदी लोकप्रतिनिधीसह मा.श्री. विवेक जॉन्सन (भा.प्र.से) प्रा.श्री. जितीन रहमान (भा.प्र.से), मा.श्रीमती संगितादेवी पाटील, मा.श्री. विलास जाधव, श्रीमती आवस्ती नारायण मेश्राम, श्रीमती समृध्दी लालाजी दिवाणे, डॉ. बालासाहेब लोमटे या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
मात्र एकूण कार्यक्रम पाहता या कार्यक्रमास खासदार बजरंग सोनवणे यांच्या व्यतिरिक्त एकही लोकप्रतिनिधी आणि आंबेजोगाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने आणि तालुका वैद्यकीय अधिकारी बालासाहेब लोमटे यांच्या व्यतिरिक्त एकाही अधिकाऱ्याची उपस्थिती दिसून आली नाही.

व्यासपीठावर केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या कार्यकर्त्यांचा भरणा दिसून आला.
या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने कोणत्याही माध्यम प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले नव्हते, किमान खासदार महोदय येत आहेत म्हणून आंबेजोगाई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तरी पत्रकारांना निमंत्रित करावयास हवे होते मात्र याही मंडळीला पत्रकारांची एलर्जी झाली आहे की काय कोणालाही त्यांनी निमंत्रित केले नाही.
दिवसेंदिवस पक्षाची वाताहत होतं असताना खासदार येऊन ही कार्यकर्त्यांना माध्यम प्रतिनिधीची आठवण होऊ नये हे दुर्देव म्हणावं हे मात्र निश्चित.
Post Views: 216
error: Content is protected !!