Skip to content
जुगारी आणि दारू विक्रीसाठी नेणाऱ्या इसमावर अंबाजोगाई पोलिसांची कारवाई 87 हजार रुपयांचा माल जप्त

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या व देशी दारू विक्री करिता घेऊन जाणाऱ्या इसमास अंबाजोगाई शहर पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत एकूण 87 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब श्री अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलीस चे पोलीस निरीक्षक श्री शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलिस अंमलदार भागवत नागरगोजे, हनुमंत चादर, बाळासाहेब पारवे, पांडुरंग काळे यांनी केलेल्या या कार्यवाही नुसार अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरन 372/2025 कलम 12(अ) म जु का प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी नामे संजय राजेभाऊ पेठे रा धाराशिव त्याच्या ताब्यातून जुगाराचे नगदी व साहित्य असा एकूण 1600/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे तर गुरन 373/2025 कलम 12(अ) मजुका प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी नामे सुरेश शिवाजी जाधव राहणार शिराज कॉलनी अंबाजोगाई याचे ताब्यातून कल्याण मटका जुगाराचे मटका जुगाराचे साहित्य व नगदी रुपये 17180/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे या शिवाय गुरन 374/2025 कलम 12(अ) मजुका प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी नामे उमेश उर्फ दत्ता शंकरराव हळवे राहणार अंबाजोगाई याचे ताब्यातून कल्याण मटका जुगाराचे मटका जुगाराचे साहित्य व नगदी रुपये 23030/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे तर गुरन 375/2025 कलम 12(अ) मजुका प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी नामे महेश नागनाथ जाधव राहणार अंबाजोगाई याचे ताब्यातून कल्याण मटका जुगाराचे मटका जुगाराचे साहित्य व नगदी रुपये 14140/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
या 4 केसेसच्या माध्यमातून 55,950/- रुपयाचा जुगाराचा माल जप्त करण्यात आला आहे तर गुरन 376/2025 कलम 65(ई) मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी नामे उत्तरेश्वर खोडवे राहणार येल्डा तालुका अंबाजोगाई याचे ताब्यातून मोटरसायकल व देशी दारू असा 31680/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे
Post Views: 311
error: Content is protected !!