Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

*प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित*

*प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित*


अंबाजोगाई :- येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने दिला जाणारा रोटरी भूषण पुरस्कार शुक्रवारी सायंकाळी एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफल, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या पुरस्कार समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबचे भावी प्रांतपाल जयेश पटेल, उपप्रांतपाल प्रविण देशपांडे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा.रोहिणी पाठक, सचिव मंजुषा जोशी, माजी अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी, सौ.शोभा खडकभावी, पारूल पटेल, शर्मिला देशपांडे यांची उपस्थित होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांचा यथोचित सन्मान करून त्यांना रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलता जयेश पटेल म्हणाले की, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी हे अंबाजोगाई शहरात गेल्या ४० वर्षापासुन शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारतीत त्यांचा मोठा वाटा आहे. सामान्य कुटूंबातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी अभियंता म्हणून घडविले. आज देश व विदेश पातळीवर त्यांचे विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून रोटरीने त्यंना हा पुरस्कार प्रदान केला आहे. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला व त्यांच्या कार्याला उजाळा देवून खडकभावी यांचे दिशादर्शक काम समाजासमोर आणले आहे.
यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत शिक्षण पोहोंचले पाहिजे. या दृष्टीकोणातूनच मी हे कार्य सुरू केले. मात्र आजही बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. अशा स्थितीत या मुलांच्या शिक्षणासाठी काय करता येईल. यासाठी सामुहिक प्रयत्न झाले पाहिजेत. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या चाळीस वर्षात अंबाजोगाईकरांनी मला जे प्रेम दिले ते कधीही विसरता येणार नाही. असे सांगुन अंबाजोगाईकरांच्या पाठबळावरच माझी वाटचाल सुरू असल्याचे खडकभावी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!