Skip to content
परळीत स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 लाख 51 हजार रुपयाचा गुटखा केला जप्त

अंबाजोगाई (प्रतिनिधी )
परळी तालुक्यातील नंदागौळ शिवारात गुप्त माहिती मिळाल्या वरुन बीड येथिल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात 6 लाख 51 हजार रुपयाचा पानमसाला व गुठखा जप्त केला आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उप निरीक्षक सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शना खाली
पो हवा रामचंद्र केकान, पोना गोविंद भताने व पो शी सचिन आंधळे यांच्या टीमला दिनांक 16/08/2025 रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास नंदागौळ शिवारात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा घेऊन जात आहे, या गोपनीय माहितीच्या आधारे या टीम ने सापळा रचुन सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचा 6 लाख 51 हजार रुपयांचा पान मसाला व गुटखा जप्त केला आहे.
या प्रकरणी जाबाज खान समीर खान वय 26 राहणार मलिकपुरा परळी या ताब्यात घेतलेल्या आरोपी सह फरार झालेल्या अरबाज बशीर शेख रा पेट मोहल्ला परळी बिया पूर्ण नाव माहित नाही या सर्व तीन जना विरुद्ध परळी ग्रामीण पो स्टे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Views: 276
error: Content is protected !!