Wednesday, October 8, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

घाटनांदूर- श्रीगोंदा- दौंड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी रेल्वे बोर्डाचे सल्लागार डॉक्टर आदित्य पतकराव यांनी घेतली रेल्वे मंत्रालयात घेतली अधिकाऱ्या सोबत पाठपुरावा बैठक 

घाटनांदूर- श्रीगोंदा- दौंड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी रेल्वे बोर्डाचे सल्लागार डॉक्टर आदित्य पतकराव यांनी घेतली रेल्वे मंत्रालयात घेतली अधिकाऱ्या सोबत  पाठपुरावा बैठक 

 

   घाटनांदूर- श्रीगोंदा- दौंड या आंबजोगाई – केज -मांजरसुंबा – पाटोदा – जामखेड-कर्जत – राशीन करांच्या रेल्वेच्या स्वप्न पूर्ती साठी रेल्वे बोर्डावरील सल्लागार व अंबाजोगाईचे भूमिपुत्र डॉक्टर आदित्य पतकराव यांनी काल रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा बैठक घेऊन या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी झोनल रेल्वे सदस्य (मध्य रेल्वे), प्रिन्सिपल सेक्रेटरी (PPS) गती शक्ती श्री. एन.सी. करमाळी व संयुक्त संचालक श्री. रवि शर्मा यांची भेट घेऊन  प्रकल्पावर सविस्तर चर्चा केली व रेल्वे मंत्री मा ना अश्विनी बन्सल यांना निवेदन सादर केले असून बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, राज्यसभेच्या खासदार सौ रजनीताई पाटील, अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके सह या मार्गांवरील सर्व लोकप्रतिनिधिने आता या मार्गासाठी पाठपुरावा करन्याची आवश्यकता आहे.

 

    स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांच्या स्वप्नातील अहिल्या नगर बीड परळी या रेल्वे मार्गा वरील अहिल्या नगर ते बीड ही रेल्वे माजी खासदार प्रीतम ताई मुंडे विद्यमान कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे आणि त्यानंतर आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रयत्नातून येणाऱ्या मराठवाडा मुक्ती दिनी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी सुरु होते आहे.

    मात्र याच दरम्यान केंद्र सरकार आणि रेल्वे खात्याच्या विचाराधीन असलेला घाटनांदुर अंबाजोगाई – केज- नेकनूर- मांजरसुंबा- पाटोदा -जामखेड -कर्जत- श्रीगोंदा दौंड या रेल्वे मार्गा साठी माजी खासदार स्व. गोपीनाथ रावजी मुंडे, माजी खासदार बबनराव ढाकणे, स्व. गोपीनाथराव मुंडे, रजनी ताई पाटील, जयसिंग गायकवाड, डॉ प्रीतमताई मुंडे या पैकी एकानेही प्रयत्न केले नसून बीड लोकसभा निवडणुकीच्या वेळी बीड जिल्ह्यातील जनतेने निवडून देताना बजरंग सोनवणे यांच्या कडून हा प्रस्तावित व प्रलंबित रेल्वे मार्ग निश्चित मार्गी लागेल अशी अपेक्षा केली होती मात्र बजरंग सोनवणे रहिवासी असलेल्या केज शहरातून हा रेल्वे मार्ग जाणारा असतानाही बजरंग सोनवणे यांनीही या रेल्वे मार्गा साठी आज पर्यंत ब्र शब्दही काढलेला नाही यामुळे नागरिकात या प्रश्नावर भ्रमनिरास झालेला आहे हे नाकारून चालणार नाही. बजरंग सोनवणे यांचा अहिल्या नगर बीड परळी रेल्वे मार्गा बरोबर बीड हुन सोलापूर व अन्यत्र जाण्यासाठी रेल्वे मार्ग सुरू करावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे मात्र वर्षानुवर्ष मागणी होत असलेल्या घाटनांदूर ते श्रीगोंदा दौंड या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी  रेल्वे खात्याला साधे एक पत्रही त्यांनी दिल्याचे दिसून येत नाही.

 

आज त्यांच्या जोडीला राज्यसभेतील खासदार सौ रजनी ताई पाटील आणि अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके हे  लाभलेले असताना या सर्वांनी स्वतः आणि या रेल्वे मार्गावरील सर्वच आमदारांना सोबत घेऊन प्रयत्न केले तर निश्चित हा रेल्वे मार्ग मार्गी लागू शकतो 

    हा रेल्वे मार्ग रेल्वे खात्यासाठी अत्यंत कमी खर्चात आणि जास्तीचे आर्थिक उत्पन्न देणारा रेल्वे मार्ग ठरणारा असून भविष्यामध्ये या पंचक्रोशीतील प्रवाशांना केवळ मुंबई पुणेच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आणि  राज्यातील नावारूपाला आलेल्या देवस्थानला जाण्यासाठी भाविकांना अत्यंत सोयीचे होणार आहे.

     विशेष म्हणजे आज रेल्वे बोर्डावर सल्लागार म्हणून  आंबजोगाईचे भूमिपुत्र डॉ आदित्य पतकराव यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेत मागील 2 महिन्या पूर्वी झालेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत या रेल्वे मार्गाचा विषय चर्चेत आणलेला होता आणि काल 15 सप्टेंबर रोजी डॉ आदित्य पतकराव यांनी 

रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा बैठक घेऊन या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी झोनल रेल्वे सदस्य (मध्य रेल्वे), प्रिन्सिपल सेक्रेटरी (PPS) गती शक्ती श्री. एन.सी. करमाळी व संयुक्त संचालक श्री. रवि शर्मा यांची भेट घेऊन  प्रकल्पावर सविस्तर चर्चा केली व रेल्वे मंत्री मा ना अश्विनी बन्सल यांना निवेदन सादर केले.

    २०१५ पासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे संपर्क सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. परळी ते अहमदनगर हा समांतर मार्ग सध्या बांधकामाधीन असून, या मार्गास घाटनांदुर–श्रीगोंदा रेल्वे लाईन जोडली गेल्यास एक महत्त्वपूर्ण कॉरिडॉर तयार होईल. यामुळे क्षेत्रातील मालवाहतूक सुलभ होईल, प्रवासाचा कालावधी कमी होईल तसेच परळी, बीड, नगर या भागातील औद्योगिक व कृषी उत्पादनांना थेट रेल्वे संपर्क मिळेल.

   या वेळी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकल्पासाठी राज्यस्तरावर चर्चा, मंत्रिमंडळात मान्यता तसेच विविध प्रशासकीय औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे २,००० ते ३,००० कोटी रुपये असून निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार यांच्या समन्वयाने करावी लागेल.

    डॉ. पतकराव यांनी मंत्रालयासमोर या प्रकल्पाचे प्रादेशिक महत्त्व स्पष्ट करत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

खासदार महोदया सह सर्व लोकप्रतिनिधींनी घाटनांदूर श्रीगोंदा रेल्वे साठी पाठपुरावा करण्याची आवश्यक

   घाटनांदूर-श्रीगोंदा-दौंड या रेल्वे साठी  बजरंग सोनवणे, रजनी ताई पाटील निलेश लंके या खासदारांनी डॉ आदित्य पतकराव यांच्या खांद्याला खांदा लावून पंतप्रधान मा ना नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री मा ना अश्विन वैष्णव यांना साकडे घालन्याची आवश्यकता असून त्यांना या रेल्वे मार्गाचे महत्व पटवून दिले तर निश्चित हा रेल्वे मार्ग मार्गी लागल्या शिवाय आणि अंबाजोगाई केज नेकनूर मांजरसुंबा पाटोदा जामखेड कर्जत राशीन कराचं स्वप्न साकार झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!