Skip to content
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी शरद जोगदंड यांना प्रशस्ती पत्र देऊन केले सन्मानीत

आंबजोगाई (प्रतिनिधी)
26 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई शहरात झालेल्या खून प्रकरणातील आरोपीस अवघ्या 4 तासात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या टीमने सोलापूर येथून अटक केल्या मुळे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी शरद जोगदंड यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानीत केल्या मुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
26 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई शहरातील लातूर रोड वर असलेल्या एका हॉटेल मध्ये अविनाश देवकर या युवकाचा खून झाल्यावर नंतर यातील आरोपी स्वराज पौळ यास अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शना खाली साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे व त्यांच्या टीमने अवघ्या 4 तासात स्वराज पौळ यास नाट्यमय रित्या ताब्यात घेतले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे यांनी या प्रकरणाचा तपास ही योग्य पद्धतीने चालवला असल्याने याची दखल बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी घेऊन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानीत केले आहे.
या प्रशस्ती पत्रात नवनीत कावत यांनी म्हंटले आहे

प्रिय शरद
आपण पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथे प्रभारी अधिकारी म्हणुन नेमणुकीस आहात. आपले पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर हददीत दिनांक 26/08/2025 रोजी गुरनं. 431/2025 कलम 103 भा.न्या.सं. अन्वये गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडला होता. सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी याचेकडे संपर्काची कोणतीही साधने नसतांना आपण आपले अधिपत्त्याखालील टिमला अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केल्याने सदर टिमने पाहिजे आरोपीबाबत गोपनिय बातमीदारांकडुन माहिती हस्तगत केली असता सदर माहितीच्या आधारे टिमने आरोपीचा कसोसीने शोध घेवुन आरोपी नामे स्वराज कारभारी पौळ रा. अंबाजोगाई यास पळुन जात असतांना सोलापुर येथुन रात्री 01.30 वाजेच्या दरम्यान अटक केली आहे.
आपल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मी आपले हार्दिक अभिनंदन करतो. तसेच भविष्यातही आपण अशाच प्रकारे कार्यक्षम, जिद्द व संवेदनशीलतेने काम करत राहून बीड जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक वाढवाल, अशी अपेक्षा बागळतो.
आपल्या या कौतुकास्पद कार्याबद्दल आपणास हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे.
शुभेच्छासह।
आपला स्नेहांकित
नवनीत काँवत (भा. पो.से)
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलेल्या या सन्माना मुळे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Views: 330
error: Content is protected !!