Skip to content
*मराठवाड्यातील सर्वप्रथम “सीएनसी ट्रेनिंग” योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये*

अंबाजोगाई:- योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित, कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक व इंडो जर्मन टूल रूम, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ सप्टेंबर ते दि.२७ सप्टेंबर दरम्यान सीएनसी प्रोग्रामिंग व मशिनिंग बाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष मा.चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या संकल्पनेतून योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम चालू असतानाच उद्योग समूहांच्या आधुनिक तंत्रज्ञान व मशीन याबाबत माहिती मिळाल्यास हे विद्यार्थी अधिक कौशल्यपूर्ण पद्धतीने विविध उद्योग समूहांमध्ये काम करू शकतील या हेतूने योगेश्वरी शिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त सीएनसी मशीन खरेदी करण्यात आलेली आहे. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील पॉलिटेक्निक मध्ये प्रथमच या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून या सीएनसी प्रशिक्षणामुळे मशीन ऑपरेट कसे करायचे, गुणवत्ता कशी राखायची आणि अचूक भाग कसे तयार करायचे हे शिकता येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्पादन क्षेत्रात उच्च दर्जाचे आणि जटिल डिझाइन तयार करण्याची क्षमता मिळते. हे प्रशिक्षण केवळ तांत्रिक कौशल्येच देत नाही, तर ऑटोमेशनमुळे मानवी हस्तक्षेपाची गरज कमी करून उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवते. या प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांना उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज केले जाणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी दिली. हे प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी इंडो जर्मन टूल रूम चे अधिकारी श्री.दीपक जगताप,मेकॅनिकल विभागाचे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा.शाम गडदे, प्रा.निशांत मस्के प्रा.सचिन हारे हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
या उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष श्री गणपत व्यास, का. उपाध्यक्ष ॲड जगदीश चौसाळकर, सचिव श्री. कमलाकरराव चौसाळकर,संचालक प्रताप पवार यांनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 249
error: Content is protected !!