जो पर्यंत आपण आपली माती आपला देश सोडून बाहेर जात नाहीत तो पर्यंत त्या मातीच महत्व आपल्याला कळत नाही डॉ आरीफ अली उस्मानी यांचे उदगार
जो पर्यंत आपण आपली माती आपला देश सोडून बाहेर जात नाहीत तो पर्यंत त्या मातीच महत्व आपल्याला कळत नाही
डॉ आरीफ अली उस्मानी यांचे उदगार
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
जो पर्यंत आपण आपली माती आपला देश सोडून बाहेर जात नाहीत तो पर्यंत त्या मातीच महत्व आपल्याला कळत नाही. आणि त्या साठी प्रयत्न केल्या शिवाय कोणतीही गोष्ट अशक्य नसते असे उदगार डॉ आरीफ अली उस्मानी यांनी काढले.
सौदी अरेबिया येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले अंबाजोगाईचे भुमि पुत्र डॉ. आरीफ अली उस्मानी यांना लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनची फेलोशीफ मिळाल्या मुळे आयोजित सत्कार समारंभात डॉ अरीफ आली उस्मानी सत्काराला उत्तर देतेवेळी ते बोलत होते.
या कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी
डॉ. सुरेश खुरसाळे (माजी अध्यक्ष योगेश्वरी शिक्षण संस्था) तर प्रमुख अतिथि म्हणून जेष्ठ समाज सेवक नंदकिशोरजी मुंदडा,
मा.डॉ. शंकरराव धपाटे (अधिष्ठाता, स्वा.रा.ती.शा.रु. व ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई), मा.श्री. राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष अंबाजोगाई), मा. श्री. पृथ्वीराज साठे (माजी आमदार, केज विधान सभा), डॉ सिद्धेश्वर बिराजदार यांची उपस्थिती होती.
अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. राहुल धाकडे व मुजीब काझी यांच्या पुढाकारणे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी आमदार पृथ्वीराज साठे म्हणाले की डॉक्टर अरीफ अली उस्मानी हे अंबाजोगाई शहराची शान याचा सर्व आंबेजोगाई कराना गर्व आहे. ज्यांनी की विदेशामध्ये वैद्यकीय क्षेत्रात आपला नावलौकिक कमावला आहे.
यावेळी बोलताना राजकिशोर पापा मोदी म्हणाले की अंबाजोगाई शहरातील उस्मानी घराणे हे उच्चशिक्षित, सामाजिक बांधिलकी जपणारे घराणे असून या घराण्याने शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून ते ज्या परिसरात राहतात अशा गुरुवार पेठ भागाने आतापर्यंत मतदार संघाला 2 आमदार दिले व शहराला 7 – 8 नगराध्यक्ष दिले आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात फेलोशिप मिलने सोपी गोष्ट नसुन डॉ अरीफ आली उस्मानी यांनी . सौदीला जाऊन जी फेलोशीप मिळवलेली आहे याचा आम्हा सर्वांना रास्त अभिमान आसुन डॉ धाकडे व मुजीब काझी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून युवकांना प्रोत्साहन दिले आहे.
यावेळी बोलताना सिद्धेश्वर बिराजदार म्हणाले की, आपल्याच माणसाने आपल्या माणसाचा सत्कार करणे ही अभिनंदनिय गोष्ट आहे. जाती धर्मा च्या पलीकडे जाऊन अंबाजोगाई येथील लोक एकमेकावर प्रेम करतात. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय उभारणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे कै.डॉक्टर व्यंकटराव डावळे हे अंबाजोगाई शहरातील पहिले वैद्यकीय क्षेत्रात फेलोशिप मिळालेले व्यक्तिमत्व असून त्यानंतर डॉक्टर अरिफ ली उस्मानी हे दुसरे डॉक्टर आहेत ज्यानी की फेलोशिप मिळवली आहे.
या वेळी बोलताना डॉ शंकर धपाटे म्हणाले की, भविष्यात डॉ उस्मानी यांचा अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेजलाही फायदा होईल. वाढत्या मेडिकल कॉलेज मुळे भविष्यात डॉक्टर बाहेर पाठवावे लागणार आहेत त्या वेळेस ही त्यांचा फायदा होईल.
सत्काराला उत्तर देताना डॉ अरीफ अली उस्मानी म्हणाले की, अंबाजोगाई शहरातील सर्वच जाती धर्मातील लोकांनी आमच्या संपूर्ण कुटुंबावर जीवापाड प्रेम केलेले असून हे ऋण आम्ही कदापिही विसरू शकत नाहीत. जो पर्यंत आपण आपली माती आपला देश सोडून बाहेर जात नाहीत तो पर्यंत त्या मातीच महत्व कळत नाही. मला जे संस्कार मिळाले ते योगेश्वरी संस्थे मधुन मिळाले आहेत. प्रयत्न केल्यावर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळेच एक जिद्द उराशी बाळगून फेलोशिप मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले, या साठी अनेकांचे सहकार्य आशीर्वाद लाभले. आज या सत्कार सोहळ्याच्या निमित्याने अंबाजोगाई कराणी जे प्रेम दाखवले आहे त्या मुळे मी भाराऊन गेलो आहे.
या पुढे माझ्या कडून जे वैद्यकीय सेवेचे काम होईल ते काम माझ्या गावची माती समोर ठेऊनच होईल असे अभिवचन त्यांनी या वेळी दिले.
अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ सुरेश खुरसाले म्हणाले की, आज समाजात विदारक परस्थिती निर्माण झाली आहे.
वैद्यकीय सेवे मधून सेवा भाव राहिलेला नाही हे कटू सत्य आहे. ज्याच्या खिशात पैसे आहेत त्यांच्या साठी वैद्यकीय सेवा आहे समाजा साठी ही नामुश्किची गोष्ट आहे. पैसे असले तरी चांगली वैद्यकीय सेवा मिळेलच याची खात्री नाही. अशा डॉक्टरांनी हा माझ्यावरचा कलंक समजला पाहिजे.
तळागाळातील व्यक्तीला सुद्धा आश्वासक पद्धतीने योग्य उपचार मिळेल या साठी सर्वानी प्रयत्न करायला हवे. या पुढे ही सेवा कारपोरेट च्या हाती जाणार आहे. हा धोका वैद्यकीय क्षेत्रा साठी आव्हान समजलं पाहिजे आणि होतकरू डॉक्टरांनी हे चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. डॉ उस्मानी यांना सल्ला देताना ते म्हणाले शिकण्या साठी आपण जरूर विदेशात जा मात्र आपली गरज भारतात आहे, या मातीला आहे. त्या ठिकाणी पैसा मिळवणे आपणास आव्हान नाही. मात्र भारतात राहून आपण सेवा करावी वैद्यकीय सेवेचा स्तर वाढवण्याचा प्रयत्न करावा.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुल धाकडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुजीब काझी यांनी केले. या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील आणि विविध जाती धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
