ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैन्य दलात जाण्यासाठी अंबाजोगाई शहरात योगेश्वरी सैनिक स्कूलची सुरवात इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परिक्षा फॉर्म भरण्या संदर्भात आवाहन
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैन्य दलात जाण्यासाठी अंबाजोगाई शहरात योगेश्वरी सैनिक स्कूलची सुरवात
इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परिक्षा फॉर्म भरण्या संदर्भात आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाईसह मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सैन्य दलात जाण्यासाठी येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने योगेश्वरी सैनिक स्कूल सुरु करण्यात आली असून इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या सैनिक स्कूल मध्ये प्रवेश परिक्षा फॉर्म भरण्या संदर्भात आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्थापित योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई जिल्हा बीड संचलित योगेश्वरी सैनिक शाळेस केंद्र शासनाच्या रक्षा मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागात मान्यता मिळालेली ही एकमेव शाळा आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील पूर्वलौकिकानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपलब्धी असणार आहे.
योगेश्वरी सैनिकी शाळेच्या माध्यमातून सैनिकी शाळेत प्रवेश मिळवून विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि इतर संरक्षण दलांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक तयारी होते. यामुळे शिस्त, नेतृत्व गुण, आणि चारित्र्य विकास यांसारख्या गुणांची वाढ होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यास मदत होते. सैनिक शाळांमधील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा एकूण व्यक्तिमत्त्व विकास होतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) या सारख्या प्रशासकीय सेवा व लष्करातील सेवेचे स्वप्न साकार करता येईल.
शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून विद्यार्थ्यांना इयत्ता 6 वी पासून या शाळेत प्रवेश घेता येणार आहे याकरिता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात येणारी परीक्षा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानुसार सर्व इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या व योगेश्वरी सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आपण NTA परीक्षा फॉर्म दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पूर्वी सादर करावा. अशी माहिती योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर सचिव श्री कमलाकर चौसाळकर उपाध्यक्ष गणपत व्यास, जेष्ठ सल्लागार प्रा गोळेगावकर, सह शिक्षक शिवहर ढगे यांनी दिली आहे.
एनटीए परीक्षा फॉर्म मुदत ही दिनांक 10 ऑक्टोबर 2025 ते 30 ऑक्टोबर 2025 असून या साठी विद्यार्थ्यांना मुलाच्या नावाचे डोमासाईल सर्टिफिकेट सत्य प्रत, मुलाचे आधार कार्ड सत्यप्रत, मुलाचे जन्म प्रमाणपत्र सत्यप्रत, सैनिक स्कूल चा फॉर्म भरण्यासाठी वर्गाची अट नसून वयाची अट आहे. ज्या मुलांचा जन्म 01 एप्रिल 2014 ते 31 मार्च 2016 या दोन तारखांच्या दरम्यानचा असावा. जर रिझर्वेशन मधून फॉर्म भरायचा असेल तर मुलाच्या नावाचे केंद्राचे जातीचे प्रमाणपत्र, मुलाचा पासपोर्ट साईज फोटो, पांढऱ्या कागदावर मुलाची काळ्या पेनने केलेली सही आवश्यक असून फॉर्म भरताना मोबाईल आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी
प्राचार्य रमण देशपांडे 9763043042 डॉ. संकेत तोरंबेकर 7020484970
मेजर एस. पी. कुलकर्णी 9011961445
प्राचार्य योगेश्वरी सैनिक स्कुल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
