*खोलेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनाधिकारी कॅप्टन सुंदर खडके राज्यस्तरीय बेस्ट ए.एन.ओ अवॉर्डने सन्मानित*
*खोलेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनाधिकारी कॅप्टन सुंदर खडके राज्यस्तरीय बेस्ट ए.एन.ओ अवॉर्डने सन्मानित*

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील खोलेश्वर महाविद्यालयातील कॅप्टन सुंदर दिगंबरराव खडके यांना नुकताच मानाचा राज्यस्तरीय बेस्ट ए.एन.ओ अवॉर्ड – २०२५ प्रदान करण्यात आला. हा सन्मान सोहळा राष्ट्रीय छात्र सेनाधिकारी, कुर्ला, मुंबई येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात दिमाखात आयोजित करण्यात आला होता.
असोसिएट एन.सी.सी.ऑफीसर
हा पुरस्कार यासाठी प्रदान केला जातो. की, जो राष्ट्रीय छात्र सेनेतील कॅडेट व महाविद्यालये तसेच भारतीय संरक्षण दलात सैनिक पुरवतो – किंवा सैन्य दलात जाण्यासाठी मार्गदर्शन करतो तो म्हणजे ए.एन.ओ होय. एन.सी.सी.च्या माध्यमातून तरूण पिढीला शिस्तबद्ध जबाबदार व देश प्रेमी घडविणारे अधिकारी वर्गाचा कार्याचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कॅप्टन सुंदर दिगंबरराव खडके यांनी मागील अनेक वर्षांपासून एन.सी.सी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम, आणि नेतृत्व गुण वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी अनेक कॅडेटची निवड अग्निवीर, फायर ब्रिगेड, पोलिस खाते, वनरक्षक दल या विविध पदांवर झालेली आहे. तसेच अनेक कॅडेट्सनी कॅप्टन सुंदर दिगंबरराव खडके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळविलेले आहे. या कार्याबद्दल कॅप्टन खडके यांचे अभिनंदन केले जात आहे. कॅप्टन सुंदर खडके यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ.कल्पनाताई चौसाळकर, स्थानिक समन्वय समितीचे डॉ.अतुल देशपांडे (अध्यक्ष, खोलेश्वर शैक्षणिक संकुल, अंबाजोगाई.), कार्यवाह किरण कोदरकर (कार्यवाह, खोलेश्वर शैक्षणिक संकुल, अंबाजोगाई.), प्राचार्य डॉ.दीपक फुलारी, उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, प्रा.डॉ.बिभीषण फड, डॉ.रवींद्र कुंबेफळकर, प्रा.आनंद पाठक आदींनी अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
=======================
=======================


