Thursday, January 15, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*आई वडीलांची मनोभावे सेवा कराल तर आपल्याला भगवंताकडे जायची गरज पडणार नाही*      ह.भ.प. जगदीश महाराज सोनवणे 

*आई वडीलांची मनोभावे सेवा कराल तर आपल्याला भगवंताकडे जायची गरज पडणार नाही*

     ह.भ.प. जगदीश महाराज सोनवणे 

सोनपेठ (प्रतिनिधी)

    आई वडीलांची मनोभावे सेवा कराल तर आपल्याला भगवंताकडे जायची गरज पडणार नाही असे उदगार ह.भ.प. जगदीश महाराज सोनवणे यांनी डिघोळ देवीचे या ठिकाणी कै. वैजनाथ तुकाराम पुजारी यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्त श्री वैभव वैजनाथ पुजारी यांनी आयोजित केलेल्या किर्तन प्रसंगी काढले.

|आलिया संसारा उठा वेग करा |

| शरण जा उदारा पांडुरंगा |

| देह हे काळाचे धन कुबेराचे |

| येथे मणुष्याचे काय आहे |

     या अभंगावर बोलताना महाराजांनी कोणी शरण जावं? कोणाला शरण जावे? का शरण जावं? याविषयी विस्तृतपणे चिंतन केले, संसारात जन्माला आलेल्या जीवाने देवाला शरण जावे ,का शरण जावे तर उद्धार करून घेण्यासाठी शरण जावे कारण संसार हा सुख देणारा नसून तो दुःखाला कारण आहे संसारात फक्त दुःख आहे आणि परमात्मा हा सुखाला कारण आहे म्हणून संसार हा पाण्यावरील बुडबुड्यासारखा आहे तो गारुड्याच्या खेळाप्रमाणे सांगितलेला आहे खरा दिसतो पण तो खोटा असतो म्हणून संसारासाठी कितीही केलं तरी बाकी उरते शून्य आणि परमार्थासाठी थोडंसं केलं तरी  बाकी उरते पुण्य, जन्माला आल्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टी नाशवान आहेत आणि आपलं काहीही नाही सर्व इथेच सोडून जावं लागतं आपण फक्त निमित्याला आहोत काही काळापुरते या पृथ्वीवर आलेलो आहोत म्हणून एकच करा देव आपुला करा त्याला शरण जा आणि जीवाचा उद्धार करा अशाप्रकारे वेगवेगळे उदाहरण देऊन सोनवणे महाराजांनी अभंगाचा अतिशय सुंदर भावार्थ प्रगट केला त्याचबरोबर महाराजांनी आई-वडिलांच्या सेवेचा पुण्य काय आहे यावर काही उदाहरण देत आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व सांगितले 

    जगाच्या पाठीवर फक्त आई-वडिलांचा आशीर्वाद मिळवा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही मनुष्याला देव मिळवायचा असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे घरात असणाऱ्या  आई-वडिलांची सेवा करा त्यांनी भगवंताची सहज प्राप्त होईल हे पुराणांमध्ये पुंडलिकाने जगासमोर दाखवून दिले पितृसेवा पुण्य लादला निधान ब्रह्म सनातन अंग संगे आई वडील म्हणजे साक्षात देव आहे 

    तुका म्हणे मायबापे | अवघी देवाचीच रूपे जगात अशक्य असणारी गोष्ट आई-वडिलांच्या सेवेने शक्य होईल मग तो देव मिळवणे जरी असला तरी अशाप्रकारे सोनवणे महाराजांनी अतिशय सुमधुर आवाजात सर्वांना भावनिक वातावरणात आई-वडिलांचे महत्त्व पटवून दिले. यां वेळी सर्व चुमकल्या टाळकरी व पकवाज वादकानी सर्वांचं लक्ष आकर्षित केलं होतं.

 

    या कार्यक्रमासाठी उपस्थित मृदंगाचार्म श्री विशाल म. फड , श्री सुदर्शन म.शिंगाडे , वैजनाथ महाराज पांचाळ, व सोनवणे आबा, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय आंबेकर परळी येथील शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य महादेव पुजारी, वैद्यनाथ देवस्थान पुजारी संतोष पुजारी, गुरव समाज अंबाजोगाई तालुका अध्यक्ष बालासाहेब बिराजदार, लक्ष्मण पुजारी, महेश डांगे, अशोक पुजारी, सुरेंद्र पुजारी, प्रदीप गुरव बालासाहेब वाघमारे यांच्या सह असंख्य भाविक उपस्थित होते. शेवटी युवा नेते नागनाथ दादा शिंगाडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!