Wednesday, September 10, 2025
अंबाजोगाई

डॉ राजेश इंगोले राज्य स्तरीय पुरस्काराने तिसऱ्यांदासन्मानित

 

 

इंडियन मेडीकल असोसिएशनच्या अत्यंत सन्मानाच्या राज्यस्तरीय डॉ.सुरेश नाडकर्णी पुरस्काराने सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले तिसऱ्यांदा सन्मानित**

*_सर्वस्तरांतून डॉ.राजेश इंगोले यांचे अभिनंदन_*
================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा व अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय डॉ.सुरेश नाडकर्णी या पुरस्काराने येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांना नुकतेच तिसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले. हा बहुमान तीन वेळा प्राप्त करणारे डॉ.इंगोले हे पहिलेच डाॅक्टर ठरले आहेत. त्यांच्या या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.

आपल्या स्पृहणीय कामगिरी बद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले की, आमच्या सर्व हितचिंतक मित्र परिवारास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, इंडीयन मेडीकल असोसिएशनचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय डॉ.सुरेश नाडकर्णी या पुरस्काराने मला यावर्षी ही राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत नुकतेच सन्मानित करण्यात आले. मला हा पुरस्कार तिसऱ्यावेळी प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रात हा पुरस्कार दोन वेळाही कोणालाच मिळाला नाही, मला मिळाला. याचे श्रेय मला नेहमीच तोलामोलाची साथ व सहकार्य देणारे डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.विजय लाड, डॉ.जुबेर शेख, डॉ.राहुल डाके, डॉ.बळीराम मुंडे, डॉ.योगेश मुळे, डॉ.नितीन चाटे, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.नितिन पोतदार, डॉ.विजय फड, डॉ.सचिन पोतदार, डॉ.प्रल्हाद गुरव, डॉ.अमोल चव्हाण, डॉ.अभय इडगर, डॉ.विवेक मुळे, डॉ.नागोराव डेरनासे, डॉ.विजय नाळपे यांच्यासह जेष्ठ मार्गदर्शक डॉ.सुधीर देशमुख, डॉ.दिलीप खेडगीकर, डॉ.एन.पी.देशपांडे, डॉ.उत्तम निसाले, डॉ.शैलेश वैद्य, यांच्यासह सर्व आयएमएच्या जेष्ठ आणि श्रेष्ठ साथीदारांचे आहे. हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. आयएमएचा अध्यक्ष झाल्यापासून इंडीयन मेडीकल असोसिएशनचे दोनदा बेस्ट प्रेसिडेंट, दोनदा बेस्ट ब्रँचचा, एकदा बेस्ट सोशिअल सेक्युरिटी मेंबर्स ड्राईव्ह आणि दोनवेळा डॉ.सुरेश नाडकर्णी हे पुरस्कार मिळाले आहेत. माझ्या विविध संकल्पनांना मूर्त स्वरूप देणाऱ्या सर्व साथीदारांचे मनःपूर्वक आभार. असेच कार्य पुढे करीत राहील अशी आपणांस ग्वाही देतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले.

======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!