Wednesday, September 10, 2025
अंबाजोगाई

*आ.नमिता मुंदडांच्या विजयासाठी ॲड शोभाताई* *सुनील काका लोमटे सरसावल्या*

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी) गेल्या विधानसभेच्या वेळी लोकनेते स्व. सुनील काका लोमटे यांनी आमदार मुंदडांच्या विजयासाठी कंबर कसली होती दुर्दैवाने काका आज आपल्यात नाहीत मात्र आज काकांच्या पश्चात त्यांच्या पत्नी ॲड शोभाताई सुनील काका लोमटे या आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ व त्यांना निवडून आणण्यासाठी विविध जाती धर्मातील लोकांमध्ये जात त्यांना मुंदडा यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.व आमदार मुंदडांनी केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवत आहेत.
एकीकडे मतदारसंघाचा विकास तर दुसरीकडे सामाजिक समतोल राखत आ.मुंदडा यांनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन कामे केली आहेत. आमदार या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी या काळात केले असून आता जनतेने त्यांना न्याय देण्याचे काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत ॲड शोभाताई सुनिलकाका लोमटे यांनी व्यक्त केले आहे.

आ.नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ कुत्तरविहीर चौकात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ॲड.शोभाताई सुनिलकाका लोमटे बोलत होत्या. पुढे म्हणाल्या सर्वसमावेशकता लोकप्रतिनिधीमध्ये असणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी हा सर्वांच असतो अन्यथा लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार नसतो. सुनिलकाकांनी शहरात काम करताना सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालण्याचे काम केले. तोच वारसा मी देखील पुढे घेऊन चालत आहे. त्यामुळे प्रचार सभेत सुध्दा सर्व घटकातील लोक
दिसत आहेत. एकंदरीत हि विकासकामांचा आढावा सभा असून अशा सभा निवडणुकीच्या दृष्टीने सुध्दा काळाची गरज आहे. या पंधरा वर्षांचे चित्र पाहिले तर मतदारसंघात सर्वधर्मसमभाव व विकासाचे मॉडल म्हणून ही जबाबदारी एका विचाराने पार पाडत आहेत. त्यामुळे आमदार मुंदडा यांना मदत करणे, सहकार्य करणे त्यांना काम करण्याची संधी देणे हे मतदारांचे कर्तव्य आहे. असे ॲड शोभाताई म्हणाल्या.

२०१६ ला नगरपालीकेच्या निवडणुका झाल्या तेव्हा याठिकाणी विकासाचा प्रचंड अनुशेष होता. शहराला एक वेगळी दिशा देण्याचे काम या पाच वर्षात झाले आहे. एकंदरीत निवडणुकीत कामावर बोलणे गरजेचे असते. आमदारकीच्या काळात कोण काय काम केले हे जनतेसमोर

सांगणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निवडणूक त्या त्या मुद्यावर झाल्या पाहिजेत. त्या पाच वर्षांत आ. मुंदडा यांनी आंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात मोठे विकासकामे केली आहेत. विकासाच्या दृष्टीने भरघोस निधी उपलब्ध करून दिली. त्यांनी केलेल्या या कामांना आणखी गती देण्यासाठी त्यांना पुन्हा संधी मिळणे हे मतदारसंघाच्या विकासासाठी गरजेचे आहे. या काळात खऱ्या अर्थाने त्यांनी त्या पदाला न्याय दिला असून आता जनतेने मतदानातून त्यांना न्याय देणे गरजेचे आहे आणि आंबाजोगाईकर हे विकासाच्या बाजूने उभे राहातील. असा मला विश्वास असून मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने आमदार नमिता मुंदडा निवडून येतील असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!