Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

जरांगेंच्या ‘त्या’ आरोपांवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच ना धनंजय मुंडे संतापले

जरांगेंच्या ‘त्या’ आरोपांवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच ना धनंजय मुंडे संतापले

मुंबई (प्रतिनिधी)

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित पत्रकार  परिषदेत जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारताच एकच संताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसला मात्र या वेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे थांबले नाहीत.

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे सांभाळत आहेत. त्यासाठीच मुंडे बाहेर फिरत आहेत, असा आरोप मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. तसेच, धनंजय मुंडे यांच्यावर 302 कलम लावण्यात यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केल्या नंतर आता जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांना मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित पत्रकार  परिषदेत जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारताच धनंजय मुंडे म्हणाले, “काय चाललंय, काय चाललंय… एकाला जरांगे-पाटील यांची प्रतिष्ठा कमी करायची आहे, एकाला वाढवायची आहे… मला नेमके कळेना… हे फक्त बातमीच्या प्रतिष्ठेसाठी चालले आहे. माझ्यासारखा माणूस मेला, तरी तुम्हाला फरक पडत नाही. मी कुणाची हत्या करण्याचा विषय सोडून द्या.”

“संतोष देशमुख प्रकरणाची पूर्ण चौकशी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालय करत आहे. माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस याबाबत बोलला नाही पाहिजे. बाकी मोठे-मोठे माणसे बोलले, तरी काय फरक पडत नाही. मला संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय पाहिजे, राजकारण नको आहे,” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

“मी माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड दौऱ्यास मी जाणार नाही,” असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!