आमदार सौ. नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधी नंतर बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात निलंबित
आमदार सौ. नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधी नंतर बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात निलंबित

मुंबई (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. नमिता मुंदडा यांनी विधान सभेत केलेल्या लक्षवेधी नंतर बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे
या विषयी प्राप्त माहिती अशी कि,
डॉ अशोक थोरात यांच्या कडे कोविड काळात बीड जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा पदभार असताना ऑक्सिजन प्लांटस, ऑक्सिजन पाईप लाईन, टेंडर, तसेच इतर खरेदी व्यव्हारात अनियमितता असल्याचे दिसून आल्याचा आरोप करून
केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. नमिता मुंदडा यांनी काल विधानसभेत या प्रश्नावर लक्ष वेधी मांडली होती.
या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात निलंबन करण्यात येईल तसेच तीन महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करावी अशी घोषणा केली आहे. कोविड काळात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला. या घोटाळ्यात डॉ. थोरात दोषी आढळले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची बीडहून नाशिकला बदली करण्यात आली. परत पुन्हा बीड जिल्ह्यात बदली का? दोषी असतील तर डॉ अशोक थोरात वरती गुन्हा दाखल करणार का? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केला. तसेच प्राथमिक चौकशीमध्ये डॉ. अशोक थोरात औषध खरेदीमध्ये प्रथमदर्शनी अनियमित्ता आढळून आली, असे भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.
या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात निलंबन करण्यात येईल तसेच तीन महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत. निश्चितपणाने सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांना आपण सस्पेंड करत आहोत. त्यांना निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल. या मध्ये जे दोष आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा आरग्यमंत्र्यांनी केली.
