महाराष्ट्राला हादरवणाऱ्या डॉ. वळसंगकर प्रकरणात सून डॉ. शोनाली वडिलांसहीत गायब असल्याने गूढ वाढले
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या डॉ. वळसंगकर प्रकरणात सून डॉ. शोनाली वडिलांसहीत गायब असल्याने गूढ वाढले
सोलापूर
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला 15 दिवसांहून अधिक कालावधी उटलून गेला असूनही या प्रकरणात कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसताना त्यांची सुन डॉ शोनाली या आपल्या वडिलांसह मागील 2 दिवसा पासून अचानक गायब झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढल्या गेले आहे.
डॉ वळसंगकर यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आत्महत्येची राज्यभरामध्ये चर्चा असतानाच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु केला. मात्र आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीचं रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेबरोबरचं कनेक्शन समोर आल्यानंतरही हे प्रकरण उलगडण्याऐवजी अधिक गुंतताना दिसत आहे. या प्रकरणाला नवी वळण देणारी गोष्ट ठरली आहे दिवंगत डॉ. वळसंगकर यांची सून!
मनीषा मानेवर संशय
पोलीस सासऱ्यांच्या मृत्यूचा तपास करत असतानाच दिवंगत डॉ. वळसंगकर यांची सून तिच्या वडिलांसोबत बेपत्ता असल्याची चर्चा सुरु आहे. सध्या डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयाची सूत्रं डॉ. शिरीष यांच्या पत्नी डॉ. उमा यांनी हाती घेतली आहे. 18 एप्रिल रोजी डॉ. वळसंगकर यांनी राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच दुसरीकडे या प्रकरणात 2008 पासून वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या मनीषा माने नावाच्या महिलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली. मनीषा मानेनेच पाठवलेल्या ईमेलमुळे नैराश्येत जाऊन डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याच अनुषंगाने तपासासाठी आजही मनिषाला न्यायालयीन कोठडीतच आहे.
मनीषामुळे डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबात वाद?
दिवसोंदिवस डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबियांकडून मनीषाला पाठीशी घालण्याचा प्रकार वाढत चालेला अशी दबव्या आवाजात चर्चा आहे. यामुळेच डॉ. वळसंगकर नाराज होते आणि हा विषय कौटुंबिक वादात रुपांतरीत झाल्याचं सांगितलं जात आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणामध्ये मनीषानंतर पोलिसांना सर्वाधिक संशय हा डॉ. शोनाली यांच्यावर आहेत. डॉ. शोनाली या डॉ. वळसंगकर यांची सून आहे. मात्र पोलीस तपासातील मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या डॉ. शोनाली अचानक गायब झाल्या आहेत.
डॉ. शोनाली शेवटी आहेत कुठे?
डॉ. शोनाली या त्यांच्या वडिलांसोबत बेपत्ता आहेत. असं असतानाच डॉ. शोनाली यांची चौकशी पूर्ण झालेली आहे की अपूर्णच आहे याबद्दलची चर्चा आहे. एका नामांकित वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. वळसंगकर यांची सून डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची चर्चा आहे. हे दोघेहीजण अमेरिकेत पळून गेल्याची जोरदार चर्चा डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयात रंगली आहे. डॉ. शोनालीचा भाऊ अमेरिकेत वास्तव्यास आहे. हे दोघेही त्याच्याकडेच गेल्याची चर्चा आहे. दुसरीकडे डॉ. शोनाली मुंबईत स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे. अन्य एका महितीनुसार, डॉ. शोनाली 30 मे नंतर रुग्णालयामध्ये परतणार असून त्या ओपीडी पाहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
