डॉ.मोहम्मद इकबाल हायस्कूलचा 10 वी बोर्ड परिक्षेत 100 टक्के निकाल
डॉ.मोहम्मद इकबाल हायस्कूलचा 10 वी बोर्ड परिक्षेत 100 टक्के निकाल
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील पेन्शनपुरा भागात असलेल्या डॉ.मोहम्मद इकबाल हायस्कूलचा इयत्ता 10 वी च्या बोर्ड परिक्षेत 100 टक्के निकाल लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा राखण्यात शाळेला यश आले आहे. गुणवंतांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे
डॉ.मोहम्मद इकबाल हायस्कूलमध्ये अत्यंत सामान्य व गरीब कुटूंबातील मुले शिक्षण घेतात. या हायस्कूलमध्ये सेमी आणि उर्दू माध्यमाची सोय आहे. दहावी बोर्ड परिक्षेचा नुकताच निकाल जाहिर झाला आहे या निकालात शाळेने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. ज्यामध्ये 15 विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले आहेत 8 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 15 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 3 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सेमी मधून प्रथम येण्याचा मान सय्यद मरियम रहिमोद्दीन हिने 94 टक्के गुण घेतले आहेत तर द्वितीय येण्याचा मान शेख मरियम आसिफ हिला मिळाला आहे तिने 90.40 टक्के गुण घेतले आहेत तर तृतीय स्थान सय्यद फुरकानअली मसुदअली याने मिळविला आहे त्याला 86.80 टक्के गुण मिळाले आहेत. उर्दू माध्यमातून प्रथम येण्याचा मान पटेल अलसभा आलम हिला मिळाला आहे 90.20 टक्के एवढे गुण घेतले आहेत द्वितीय क्रमांकावर शेख मिसरीन फातेमा मुस्तफा ही आहे तिला 83.80 टक्के गुण मिळाले आहे तर तृतीय क्रमांकवर शेख आयान बाबुमियाँ याने पटकाविला आहे त्याला 75.80 टक्के गुण मिळाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
