विनोद रापतवार यांना कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानचा आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर
विनोद रापतवार यांना कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानचा आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
अंबाजोगाईचे भुमी पुत्र तथा नागपुर चे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांना कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानचा आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर झाला आहे.
केज तालुक्यातील ऊंदरी येथील कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील प्रतिष्ठान च्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, आजच्या या व्यवहारी, स्वार्थी आणि अलिप्ततावादी समाजात आपण कौटुंबिक आदर्श मूल्यांची जपणूक करत, नातेसंबंधातील जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, माया, ममता इ. भावनिक मूल्ये संवर्धित करून मानवी समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे. ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे भरतासारखे आदर्श बंधूप्रेम आपल्या ठायी वसलेले आहे. हा बंधूभाव दूराप्रस्थ होत जाणाऱ्या या काळात आपला आदर्श अनुकरणीय आहे. आपण बंधूप्रेम, कौटुंबिक संस्कार व सार्वजनिक हिताचे कार्य केले असून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात दीपस्तंभ म्हणून कार्यरत आहात. त्याकरीता कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२४ चा आदर्श बंधू भरत पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन आपणांस गौरविण्यात येत आहे.
दशम पुण्यस्मरण, पुरस्कार वितरण व शेतकरी मेळावा कार्यक्रम दि. मे २६, २०२५ रोजी सकाळी ठिक १०.०५ वा. आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी आपण पुरस्कार स्विकारण्यासाठी उपस्थित रहावे अशी विनंती कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठान घ्या अध्यक्षा श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे-पाटील, जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे-पाटील, व समस्त गावक-यांच्या वतीने करण्यात आली आहे.
सदरील पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल विनोद रापतवार यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
