Skip to content
शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरनाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं गुन्हेगारी विश्व चर्चेत
सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते जात पात बाजूला ठेऊन आरोपीस कडक कार्यवाही करावी मागणी साठी रस्त्यावर उतरु लागली

शिवराजची भेट घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेत्यांची व कार्यकर्त्यांची रिघ
आंबजोगाई
परळी तालुक्यातील शिवराज दिवटे याला झालेल्या अमानुष मारहाणीने पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं गुन्हेगारी विश्व चर्चेत आले असून या प्रकरणी सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते जात पात बाजूला ठेऊन आरोपीस कडक कार्यवाही करावी या मागणी साठी पुढे येऊन रस्त्यावर उतरताना दिसत आसुन शिवराजची भेट घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेत्यांची व कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे.
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला पाच महिने पूर्ण होण्याच्या आधीच शुक्रवारी संध्याकाळी परळीच्या डोंगराळ भागात पंधरा ते विस पोराच्या टोळक्याने शिवराज याला अपहरण करून बांबू व लाकडाने मारहाण केली. मारहाणीच्या वेळी आरोपींनी “तुझा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा आहे” अशी धमकीही दिली, दरम्यान ही घटना ज्या टोकवाडी नजिक च्या मंदिर परिसरातील डोंगरात घडली आणि याच वेळी मंदिरात लग्न असल्याने शिवराजच्या किंकाळ्या एकूण आणि शिवराजच्या साथीदाराने वऱ्हाडा कडे येऊन मदतीला येण्याची विनंती केल्याने आणि वऱ्हाडी मदतीला धावल्याने आरोपी पळून गेले आणि शिवराजचा जीव वाचला नसता खरोखरचं त्या ठिकाणी “संतोष देशमुख पार्ट 2” झाला असता.

दरम्यान आरोपीनी केलेल्या मारहानीचा व्हिडीओ वाऱ्या सारखा सर्वत्र पसरला राज्यभरातून संतापाची लाट उसळली आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं गुन्हेगारी विश्व चर्चेत आले आले. या प्रकरणी सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते जात पात बाजूला ठेऊन आरोपीस कडक कार्यवाही करावी या मागणी साठी पुढे येऊन रस्त्यावर उतरताना दिसत आसुन शिवराजची भेट घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेत्यांची व कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती ताई मेटे पाठोपाठ आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आ सुरेश अण्णा धस, मराठा संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सह मा आ पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, अमर देशमुख, डॉ नरेंद्र काळे, दिलीप काळे, मदन परदेशी, यांनी जखमी शिवराज याची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या सर्वानी आरोपीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी, आरोपीस कडक शासन व्हावे या सह अशा सर्व प्रकरनावर आळा बसावा या साठी जिल्हा पोलीस अधीक्षक दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
फुलचंद कराड यांच्या नेतृत्वा खाली रस्ता रोको

दरम्यान या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अनेक नेते जात पातं बाजूला ठेऊन गुन्हेगार कोणत्या जातींचे आहेत हे न पाहता त्याला शासन झाले पाहिजे या विचाराने रस्त्यावर उतरत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते फुलचंद कराड यांच्या नेतृत्वा खाली आज परळी-बीड रोड वर रास्ता रोको ही करण्यात आला. या वेळी सर्व आंदोलन कर्त्यानी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आरोपीस कडक कार्यवाही करण्याची मागणी केली.
पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली गंभीर दखल

दरम्यान या प्रकरणाची पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी समाधान मुडे, रोहीत मुंडे, अदित्य गित्ते, रुषीकेश गिरी, प्रशांत कांबळे, समिञ शिंदे सौमिञ गोरे, रोहण वागळकर, सुरज मुंडे, स्वराज गित्ते या सह अनोळखी दहा जना विरुद्ध परळी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील 7 आरोपीला अटक करण्यात आली आहे यातील 2 आरोपी अल्पवयीन असल्याने अटक केलेल्या 5 आरोपी ला 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सर्व आरोपीवर मोक्का लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी पोलीस प्रशासनास दिल्या आहेत.
शिवराज दिवटे प्रकरणा कडे जाती पातीच्या चष्म्यातून पाहू नका- आ धनंजय मुंडे

संदीपान दिवटे व शिवराज दिवटे हे आमच्या कुटुंबातील असून कुठल्या कारणाने भांडण झाले आणि शिवराज ला मारायला कोण कोण होते याचा तपास पोलिसांनी बऱ्या पैकी केलेला आहे. कोनीही या प्रकरणाकडे जातीपतीच्या चष्म्यातून पाहू नये आशी प्रतिक्रिया आ धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याची रुग्णालयात भेट घेतल्या नंतर माध्यमाशी बोलताना दिली.
या वेळी त्यांच्या समवेत माजी आमदार संजय दौंड, राजकिशोर पापा मोदी, शिवाजीराव सिरसाट, राजेश्वर चव्हाण, राजाभाउ औताडे, रणजित लोमटे, प्रवीण जायभाय यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 174
error: Content is protected !!