Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

महाराष्ट्रात नवीन तालुक्यांची निर्मिती होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; नव्याने किती तालुके बनणार ?

महाराष्ट्रात नवीन तालुक्यांची निर्मिती होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; नव्याने किती तालुके बनणार ?

हिंगोली 

  सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 358 तालुके अस्तित्वात आसुन राज्यातील भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार केले जावेत अशी आग्रही मागणी सातत्याने केली जात आसतांना राज्यात नवीन तालुका निर्मितीचे संकेत मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

   खरे तर जिल्हा आणि तालुका विभाजनाचा विषय फारच जुना आहे. आपल्या पैकी अनेकांचा जन्मही झालेला नसावा तेव्हापासून हा विषय पटलावर आहे. परंतु याबाबतचा सकारात्मक निर्णय अजून कोणत्याच सरकारकडून घेण्यात आलेला नाही.

खरेतर, सध्याच्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन 22 जिल्हे तयार करणे प्रस्तावित आहे आणि सध्याच्या 358 तालुक्याचे विभाजन करून आणखी 49 नवीन तालुके तयार करणे प्रस्तावित आहे.

खरंतर याबाबतचा प्रस्ताव दहा वर्षांपूर्वीच तयार झालाय. पण अजूनही जिल्हा निर्मितीबाबत आणि तालुका निर्मिती बाबत योग्य तो निर्णय घेतला गेलेला नाही. अशातच, आता पुन्हा एकदा नवीन तालुका निर्मितीच्या चर्चांना वेग आला आहे.

नवीन तालुका निर्मिती बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक विधान चर्चेत आले आहे. म्हणून जिल्हा निर्मिती बाबत नाही तर तालुका निर्मिती बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुका निर्मितीचे काम लवकरच पूर्ण होण्याचे संकेतही आता मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की 29 मे 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या तालुका निर्मितीच्या प्रश्नाला हात घातला. त्यांनी राज्यातील काही नव्या तालुक्यांच्या निर्मितीला चालना दिली जाणार आणि हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव आणि आखाडा बाळापूर या नव्या तालुक्यांची निर्मिती होणार असे संकेत दिले आहेत.

या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील गोरेगाव या अप्पर तालुका निर्मितीची घोषणा केली होती आणि या ठिकाणी आता तालुका दर्जाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा केलेली आहे.

एवढेच नाही तर, पुढील काळात महाराष्ट्रातील इतर तालुक्यांच्या निर्मिती सोबतच गोरेगाव तालुका बनवला जाईल अशी ही घोषणा त्यांनी यावेळी केली.

हिंगोलीमधील आखाडा बाळापूर तालुक्याबाबत सुद्धा माहिती घेणार असेही आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलेले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच राज्यात नवीन तालुक्यांची निर्मिती करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!