Thursday, June 5, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

संभाजी नगर दरोडा प्रकरणी अंबाजोगाई शहरातील 4 सराफा सुवर्णं कारागीरास चौकशी कामी ताब्यात घेतले, चौकशीत तथ्य न आढळल्याने त्यांना सही सलामत  परत आणून सोडले 

संभाजी नगर दरोडा प्रकरणी अंबाजोगाई शहरातील 4 सराफा सुवर्णं कारागीरास चौकशी कामी ताब्यात घेतले, चौकशीत तथ्य न आढळल्याने त्यांना सही सलामत  परत आणून सोडले 

आंबजोगाई
   संभाजी नगर येथील दरोडा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अंबाजोगाई शहरातील दरोडे खोराने सोने विक्री केल्याचा आरोप केल्याने शहरातील 4 सराफा सुवर्णं कारागीरास संभाजी नगर पोलिसांनी उचलले मात्र केज पर्यंत नेऊन चौकशीत तथ्य न आढळल्याने त्यांना सही सलामत परत अंबाजोगाई शहरात आणून सोडले असून या प्रकरनाने अंबाजोगाई सोनार सराफ संघठना आक्रमक झाली होती सर्वानी आपले व्यवसाय बंद करून शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
    चोर, दरोडेखोर चोऱ्या करतात आणि चोरी केलेल्या सोन्याची विलेव्हाट लावतात. मात्र वयक्तिक द्वेषा पोटी हे दरोडेखोर अनेक वेळा अमुक व्यापाऱ्यांना आम्ही सोने विक्री केल्याचे आरोप करतात, काही वेळा यात तथ्य ही असते मात्र अनेक वेळा हे आरोप बिन बुडाचे असल्याने अनेक चांगल्या सोन्याच्या व्यवसायिकांना त्याचा नाहक त्रास होतो बदनामी होते असे प्रकार यापूर्वीही अंबाजोगाई शहरात घडलेले आहेत.
      मागील पंधरा दिवसांपूर्वी संभाजीनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर जो दरोडा पडला यात अंबाजोगाई शहरातील सूर्यकांत गंगणे आणि सोहेल या दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याच तपासकामी
संभाजी नगर वाळूज येथील तपास अधिकारी साळुंके व त्यांचे सहकारी  कर्मचारी हे दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सोहेल नामक आरोपीला घेऊन आज सकाळी आंबाजोगाई शहरात आले, सोहेल या आरोपीने सोने विक्री केल्याचा आरोप केल्याने या तपास पथकाने सराफा सुवर्णं कारागीर (आटणी व्यावसायिक) प्रशांत भोसले, विजय कदम, नागेश चव्हाण, संदीप भगत यांना तपासा कामी ताब्यात घेतले. सोहेल या आरोपीने केलेला आरोप खोटा असल्याने व नाहक रित्या या चार व्यापाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने
अंबाजोगाई सोनार सराफ संघठना आक्रमक झाली होती. व्यवसाय बंद करून शहर पोलीस ठाण्यात सर्वांनी ठिय्या मांडला होता.
    आंबाजोगाई येथील सोनार सराफ संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी या वेळी तपास अधिकाऱ्यास सदर गुन्ह्यातील आवश्यक कागदपत्रे मागणी केली परंतु त्यांनी ते दिले नाहीत.
    बाजार पेठेतुन ताब्यात घेतलेले व्यावसायिका कडे सिसिटीव्ही आहेत, ते  तपास अधिकाऱ्यास तपासात पूर्ण सहकार्य करण्यास देखील तयार आहेत. परंतु संभाजी नगर येथील तपास अधिकारी हे काही एक ऐकण्यास तयार नव्हते. त्या मूळे शहरातील सर्व व्यवसायिक संतप्त झाले, या संदर्भात सोनार सराफ संघटनेच्या वतीने शहर पोलिसांना निवेदन
देऊन महाराष्ट्र शासन निर्गमित जी.आर. क्र. व्हीआयपी जी७२३/प्र क्र हा९१/ पोल १३ मधील नियमांचे पालन करून व प्रतिष्ठित सराफ सुवर्णकार व संलग्न कारागीर व्यावसायिक यांच्या संविधानिक हक्काची पायमल्ली न करता चोरीच्या गुन्ह्यातील तपास करून गुन्ह्यातील एफ आय आर व अटक आरोपीचा कबुली जवाब इत्यादी कागदपत्राची मागणी केली.

    केज मध्ये पाहुणचार करून परत आणून सोडले

   संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अंबाजोगाई शहरातील चारही व्यापाऱ्यांना केज पर्यंत घेऊन जाऊन प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी केली यात कुठलाही तथ्य दिसून न आल्याने अक्षर शेवटी या पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांना जेवण खावू घालून परत अंबाजोगाई शहरात आणून सही सलामत सोडले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!