Thursday, June 5, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला अंबाजोगाई पोलिसांनी घेतले ताब्यात 

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला अंबाजोगाई पोलिसांनी घेतले ताब्यात 

 मुंबई

   बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला रविवारी (1 जून) पोलिसांनी दिल्ली येथे अटक केल्या नंतर  सोमवारी (2 जून) मुंबईतील किल्ला कोर्टात हजार करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असताना न्यायालयाच्या परवानगीने आज दुपारी अंबाजोगाई पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतले असून पोलीस पथक आंबेजोगाईच्या दिशेने निघाले आहे.

   सध्या महाराष्ट्राच्या वर्तुळात चर्चेत असलेले नाव म्हणजे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले. रणजित कासले याला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली होती. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे, आंबजोगाई शहर पोलीस स्टेशन आणि सायबर विभागात त्याच्याविरोधात रविवारी आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, मुंबईतही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात रणजीत कासलेला अटक करण्यात आली. दरम्यान, पोलीस त्याला कोर्टाबाहेर घेऊन जाताना कासलेने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी त्याने ‘इन्कलाब जिंदाबाद, महाराष्ट्र सरकार हाय हाय’ अशा घोषणा दिल्या.

   बीड पोलीस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते. तर, निवडणुकीत ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी आपल्या खात्यावर धनंजय मुंडे यांच्या माणसाकडून 10 लाख रुपये टाकल्याचा दावाही त्याने केला होता. काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नेत्यांवर गंभीर आरोप करत विविध दावे केले, ज्यामुळे एकच खळबळ माजली होती. याच सर्व प्रकरणांमुळे राज्यातील विविध भागांमध्ये कासले याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्याच्या विरोधात बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांच्या तक्रारीवरुन सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी, तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे हे प्रकरण आहे.

दुसरा गुन्हा मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मिडीयातून केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी ही तक्रार दिली असून या दोन्ही तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड, परळी, अंबाजोगाई यासह मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही दिवसापूर्वीच रणजित कासलेला जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर कासलेने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आरोप सुरू केले होते.

  अंबाजोगाई पोलिसांनी रंजीत कासलेला घेतले ताब्यात 

बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला रविवारी पोलिसांनी दिल्ली येथे अटक केल्या नंतर सोमवारी मुंबईतील किल्ला कोर्टात हजार करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असताना अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला रंजीत कासले याचे विरुद्ध दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत व अंबाजोगाईचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस कॉन्स्टेबल चादर पोलीस कॉन्स्टेबल भागवत नागरगोजे वाहन चालक ए एस आय शिंदे हे पोलीस पथक आज पहाटे मुंबई मध्ये दाखल झाली आणि या पथकाने न्यायालयाच्या परवानगीने आज दुपारी अंबाजोगाई पोलिसांनी कासले यांना ताब्यात घेतले असून पोलीस पथक आंबेजोगाईच्या दिशेने निघाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!