भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 11 व्या स्मृतिदिना निमित्य गोपीनाथ गडावर ना पंकजा मुंडे आणि आ धनंजय मुंडे एकत्र
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 11 व्या स्मृतिदिना निमित्य गोपीनाथ गडावर ना पंकजा मुंडे आणि आ धनंजय मुंडे एकत्र
परळी
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 11 वा स्मृतिदिना निमित्य परळीतील गोपीनाथ गडावर वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आज गोपीनाथगडावर एकत्र दिसून आले. मुंडे बंधुभगिनी तब्बल 11 वर्षांनी आज एकत्र गोपीनाथ गडावर हजेरी लावली.
आज संपूर्ण राज्याचं लक्ष गोपीनाथगडाकडे लागलं होतं. मंत्रीपद गेल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, त्यांनी आज देखील कार्यक्रमामध्ये बोलणं टाळल्याच्या चर्चा आहेत. यावेळी पंकजा मुंडे यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
धनंजय मुंडेंना मी विचारले...
गोपीनाथ गडावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडेंना मी विचारले मात्र ते म्हणाले आमच्या सगळ्यांच्यावतीने तूच बोल. आजपर्यंत मला साथ दिलेल्या, जीवनामध्ये मी माझ्या पायांवर उभं राहत असताना ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली, पाठिशी उभे राहिले त्यांचे मी हात जोडून मी आभार व्यक्त करते. हे एक कुंटूंब आहे. दरवर्षी काय करावं असा प्रश्न पडतो. ज्या बापाला जखम झाली म्हणून कळलं असतं. तर या देशात इतक्या लोकांनी रक्त दिलं असतं. त्याचा एक इतिहास तयार झाला असता. त्याच आठवणी मी रक्तदान शिबीर घेते, मी देखील इथं रक्तदान करते. जर त्यांना रक्त लागलं असतं तर आपण कमी पडू दिलं असतं का? त्यांना लागलं असतं तर आपण काहीचं कमी पडू दिलं नसतं. पण कोणालाच कमी पडू नये म्हणून आपण रक्तदान शिबीर घेतो, आरोग्य शिबिर घेतो. वेगवेगळे कार्यक्रम राबवतो, या कार्यक्रमामधून आम्ही गोपीनाथ मुंडे यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो, असंही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
माणूस चुकतो, मागतो, आम्हीही चुकलो असेल...
ईश्वराला देखील मागावं लागतात तो मागितल्याशिवाय देत नाही. आपण देखील मागण्यासारखं असावं लागतं. गोपीनाथ मुंडे यांचे विचार त्यांचे संस्कार आपल्या सोबत आहेत. माणूस चुकतो, मागतो, आम्हीही चुकलो असेल, पण त्यांची माणसांप्रतीची चांगली भावना होती, त्यामुळे ते आज आपल्यासोबत जिवंत आहे. ते त्यांच्या कर्तृत्वामुळे जिवंत आहे. ते पुण्य आत्मा आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी वाईट चिंतत नाही. त्यांना खूप काही करायचं असतं. त्यामुळे मुंडे साहेबांच्या मनात सर्वसामान्याविषयी चांगली भावना होती म्हणून ते लोकांच्या मनात जिवंत आहेत. सर्वसामान्यांचा वाली बनण्याची प्रेरणा त्यांनी मला दिली. गोपीनाथ मुंडे असते तर आज मोठ्या पदावर असले असते, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पांडवांना आणि रामाला देखील वनवास सहन करावा लागला होता, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण असे कीर्तनात ऐकले, असंही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांची भावनिक पोस्ट
धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक भावनिक पोस्ट सोशल मिडियावरती शेअर केली आहे.
“#अप्पा
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब (अप्पा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक नमन…
आयुष्यभरातील प्रत्येक संघर्ष हे संकट नाही तर संधी म्हणून तुम्ही सामोरे गेलात. तुमच्याच प्रेरणेने आज संघर्षाच्या वाटेवर निखारे तुडवत चालतो आहे, पण उतनार नाही, मातणार नाही…!
अप्पा, तुमच्यासारखा लोकनेता आम्ही अनुभवला हे आमचं भाग्य! नियतीने अकाली तुम्हाला आमच्यापासून हिरावून नेले, किती ते दुर्भाग्य! सदैव स्मरणात…
तुमचा धनंजय
#लोकनेता”, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी शेअर केली आहे
