Saturday, June 7, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

बँकेचे बनावट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट व फॉर्म नंबर 35 दाखल केल्याप्रकरणी अंबाजोगाई पोलिसात वाहन चालक व एका पीयूसी सेंटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

बँकेचे बनावट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट व फॉर्म नंबर 35 दाखल केल्याप्रकरणी अंबाजोगाई पोलिसात वाहन चालक व एका पीयूसी सेंटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

 

 अंबाजोगाई
   बँकेचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट व फॉर्म नंबर 35 हे बनावट दस्तऐवज दाखल करून फसवणूक केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई पोलिसात वाहन चालक व एका पीयूसी सेंटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याविषयी प्राप्त माहिती अशी की अंबाजोगाई तालुक्यातील सोमन वाडी येथील रहिवासी सौदागर दत्तू सोनवणे यांनी एम एच 44 यु २९५३ हे  वाहन चोरोमंडल इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा लातूर यांच्याकडून कर्ज काढून खरेदी केलेले असताना व या कर्जाची परतफेड न करता आहे या वाहनावर चोरोमंडल इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा लातूर यांचा बोजा असताना आरोपी सौदागर दत्तू सोनवणे रा. सोमणवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड अ.क्र. 2) सलीम शेख (सलीम पीयूस ी) पुर्ण नांव व पत्ता माहित नाही यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड.येथे वाहन क्रमांक MH.44.U.2953 या वाहना संदर्भातील नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट व फॉर्म नंबर 35 हे बनावट दस्तएवज तयार करुन त्यावर खोटी सही व शिक्का मारून ते दस्तएवज बनावट असल्याचे माहित असताना देखील खरे दस्तएवज असल्याचे भासवून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी सादर केले व सौदागर दत्तू सोनवणे व  सलीम शेख यांनी स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वाहनावरील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई यांचे कडून कर्ज बोजा व परवाना (Permit) उतरवून सदरचे वाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे या कार्यालयात दुसऱ्या व्यक्तीस विक्री करुन शासनाची व बँक फायन्सास कंपनीची फसवणूक केली. ही फसवणूक लक्षात येताच अंबाजोगाई येथील उप प्रादेशिक कार्यालयातील  अशोक सयाराम बोलचेटवार वय 32 वर्ष यांच्या फिर्यादी वरून
सौदागर दत्तू सोनवणे रा. सोमणवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड व सलीम शेख (सलीम पीयूस ी चालक ) यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसात
गुरनं 283/2025 कलम 318(4),336 (3), 340(2),336(2),316(2),341(1),3(5) BNS. नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्या असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!