Saturday, June 7, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

उसने दिलेले पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने संतापलेल्या मित्राने मित्राची नवीकोरी १८ लाखांची इनोव्हा कारच जाळली 

उसने दिलेले पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने संतापलेल्या मित्राने मित्राची नवीकोरी १८ लाखांची इनोव्हा कारच जाळली 

नांदेड 

   उसने दिलेले पैसे परत देत नसल्याच्या रागातून एका व्यक्तीने त्याच्या मित्राची नवी कोरी इनोव्हा कार जाळल्याची घटना नांदेड शहरात घडली असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

   १८ लाख रुपयांची इनोव्हा कार जळून खाक झाली. या प्रकरणी नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश ठाकूर नावाच्या तरुणाने मनजीत पवार या त्याच्या मित्राला काही पैसे उसने म्हणून दिले होते. सुरुवातीला त्याने पैसे मागितले नाही. पण बराच काळ झाल्यानंतर दिनेशने मनजीतकडे पैशांची मागणी केली. वारंवार तगादा लावूनही मनजीत पैसे परत देत नव्हता. या गोष्टीचा दिनेश ठाकूरला प्रचंड राग आला.

उसने पैसे न दिल्याच्या रागात दिनेश ठाकूरने मनजीत पवारची नवा मोंढा भागातून नवी कोरी इनोव्हा कार घेऊन भोकर शहराचा रस्ता गाठला. भोकर जवळ गेल्यानंतर १८ लाख रुपये किंमतीच्या इनोव्हा कारवर त्याने पेट्रोल टाकले. त्यानंतर कारला आग लावून ती जाळून टाकली. गाडी जळत असताना आसपासच्या लोकांच्या मोबाईलमध्ये ही आगीचे रौद्ररुप कैद केले.

मित्राकडून पैसे उसने घेणे आणि ते पैसे वेळेवर न देणे नांदेडमधल्या एका तरुणीला महागात पडले आहे. मनजीत पवार या तरुणाने त्याच्या मित्राकडून पैसे घेतले होते. पण त्याने हे पैसे परत केले नव्हते. ज्या मित्राकडून मनजीतने पैसे उसने घेतले होते, त्याने मनजीतची १८ लाख रुपये किंमतीची नवी कोरी इनोव्हा कार जाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!