केज कळंब रस्त्यावर एसटी बसने घेतला पेट ,चालक-वाहकाच्या प्रसंगावधानाने जिवीतहानी टळली, चालत्या बस गाडीला बोनटमधून आग
केज कळंब रस्त्यावर एसटी बसने घेतला पेट ,चालक-वाहकाच्या प्रसंगावधानाने जिवीतहानी टळली, चालत्या बस गाडीला बोनटमधून आग
केज ! प्रतिनिधी .
आज दुपारी ३:३० वा.च्या दरम्यान केज कडून कळंबकडे जाणारी प्रवाशांनी खचाखच भरलेली बसने अचानक पेट घेतला. मात्र या अपघातात चालक आणि वाहकाच्या प्रसंगाधावनतेमुळे पुढील अनर्थ टळलेला आहे.
या बाबतची माहिती अशी की दि. ९ जून रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास कळंब आगाराची केज कळंब (एम एच- ११/बी एल- ९३७५) ही कळंब आगाराची एसटी बस केज कडून कळंबकडे जात असताना केज ते साळेगाव दरम्यान चिंचोली पाटी जवळ असलेल्या शेख फरीदबाबा दर्गा जवळ या बसच्या बॉनेटने अचानक पेट घेतला. अचानक पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून एसटी बस चालक अनिल बारकुल आणि वाहक भांगे यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेतली. तोपर्यंत प्रचंड आग भडकलेली होती. परंतु चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांनी प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. त्यानंतर अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी हजर झाली परंतु तो पर्यंत पूर्ण एसटी ही जळून भस्मात झालेली होती. या अपघातात तीन ते चार प्रवासी हे किरकोळ जखमी झालेले आहेत.
