स्वा रा ती मधील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माजलगाव येथील महिलेचा मृत्यू, नातेवाईकांनी केला गंभीर आरोप
स्वा रा ती मधील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे माजलगाव येथील महिलेचा मृत्यू, नातेवाईकांनी केला गंभीर आरोप
अंबाजोगाई
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माजलगाव येथील रहिवासी आसलेल्या श्रीदेवी सोनवणे या महिलेचा ऑपरेशन थेटर मध्ये मृत्यू झाल्याचा आरोप मयत श्रीदेवीच्या नातेवाईकांनी करत उपजिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आणि आम्हाला संभाजीनगर येथे प्रेताचे शवविच्छेदन करावयाचे आहे त्यासाठी आमचे प्रेत आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली मात्र शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्याच्या मध्यस्थीने शवविच्छेदन स्वाराती मध्येच करण्यात येऊन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
याविषयी प्राप्त माहिती अशी की श्रीदेवी कल्याण सोनवणे रा. माजलगाव ह्यांची गळ्याची सर्जरी करण्यासाठी स्वा.रा.ती.ग्रा.वै. महाविद्यालय अंबाजोगाई येथे 08.06.2025 रोजी उपचारार्थ भरती केले होते. यावेळी त्यांच्यावर ऑपरेशन करण्याची तारीख 11.06.2025 रोजी असल्याने त्यांना ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आले. मात्र आत मध्ये ऑपरेशन होण्या आधिच त्यांचा मृत्यू झाला.
त्या नंतर त्या ठिकानचे जुनियर व सिनियर डॉक्टर यामध्ये जो वादग्रस्त सवांद झाला त्या वरून डॉक्टरांच्या हजगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असा
आरोप मयताचा मुलगा श्रीकांत कल्याण सोनवणे यांनी केला व त्याने व उपस्थित नातेवाईकांनी स्वा.रा.ती.ग्रा.वै. महाविद्यालय अंबाजोगाई येथे मयताचे शवविच्छेदन करावयाचे नाही असा पवित्रा घेऊन आम्हाला मयताचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथे करावयाचे आहे असा आग्रह धरून त्यांनी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन
मयत श्रीदेवी कल्याण सोनवणे वय 39 वर्षे रा. माजलगाव ता. माजलगाव जि. बीड यांचे शवविच्छेदन स्वा.रा.ती.मा.वै. महाविद्यालय अंबाजोगाई येथे न करता छत्रपती संभाजीनगर येथे करावयाचे आसल्याने आमचे प्रेत आमच्या ताब्यात मिळावे व अंबाजोगाई येथील हॉस्पीटलचे CCTV फुटेज तात्काळ मिळावे अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली होती मात्र आंबाजोगाई शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेत व मयत महिलेच्या नातेवाईकांची समज काढून अखेर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्येच शवविच्छेदन करण्यास संमती दिली व त्यानंतरच सेवाविच्छेदन करून या महिलेचे प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या संदर्भात डॉक्टरांची बाजू माहीत करून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
