Skip to content
*अंबाजोगाईत आयएमएच्या वतीने 240 पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीयांची केली आरोग्य तपासणी*

——————————————-
*अंबाजोगाई/ प्रतिनिधी*
अंबाजोगाई शहर व परिसरातील जनसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे आणि यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना कर्तव्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. समाजाप्रती जीवन समर्पित करणाऱ्या पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीयांची महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दि.15 जून रोजी आय.एम.ए अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले.
आयएमए अंबाजोगाईच्या वतीने सतत सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक दायित्व म्हणून समाजातील प्रत्येक घटकाला मदत व सहकार्य व्हावे आणि सामाजिक देणे लागतो या भूमिकेतून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पोलीस या शब्दातच धाक आणि दरार आहे. कारण हा घटक म्हणजे समाजातील सर्वोच्च आणि महत्त्वाचा घटक आहे. हा घटक जर व्यवस्थेत (सिस्टीममध्ये) नसेल तर सर्वत्र अनागोंदी माजलेली असते परंतु ‘ पोलीस आहेत म्हणून आपण आहोत ‘ या जाणिवेतून आयएमए व रोटरी क्लब यांनी संयुक्तपणे पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबासाठी महारोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. हे शिबिर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी रविवार दि.15 जून रोजी आयोजित केले गेले.या शिबिरात अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी, अधिकारी,चालक, रीडर यांनी सहभाग नोंदवला. या आरोग्य शिबिरात वेगवेगळ्या २० आजारांचे तज्ञ सहभागी झाले होते. या शिबिरात केवळ पोलीसच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा सहभागी करून घेतले. उद्घाटन कार्यक्रमात अंबाजोगाई शहरचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड,अंबाजोगाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले, आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पो.नि.मुरलीधर खोकले म्हणाले की, इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी पोलिस बांधव व त्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय दिला. ताण,तणाव व कामाचा व्याप यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर ताण येतो. यासाठी त्यांनीं वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली पाहिजे असे सांगून आय एम ए अंबाजोगाईच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.नवनाथ घुगे यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्या मागची भूमिका मांडली. व पोलिसांनी या धावपळीच्या युगात कामाचा ताण न घेता आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचा मौलिक सल्ला दिला.
या शिबिरात हृदयरोग,मधुमेह, छातीविकार व दमा, अस्थिरोग,बालरोग,नेत्र तपासणी,स्त्रीरोग, दंत चिकित्सा, त्वचारोग,यासह इसीजी, रक्तातील कोलेस्टरोल , रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्याही करण्यात आल्या.
महाआरोग्य शिबिरात डॉ.नवनाथ घुगे,डॉ.राहुल धाकडे,डॉ.अतुल शिंदे,डॉ.संजय शेटे,डॉ.अनिल मस्के,डॉ.अरुणा केंद्रे,डॉ.अनिल भुतडा, डॉ.मनिषा भुतडा,डॉ.स्नेहल होळंबे,डॉ.चेतन आदमाने,डॉ.सचिन पोतदार,डॉ.उद्धव शिंदे, डॉ.जबेर शेख,डॉ.विजय लाड,डॉ.निलेश तोष्णिवाल,डॉ.विनोद जोशी,डॉ.योगेश मुळे,डॉ.संदीप चव्हाण,डॉ.शाहिद शेख, ,डॉ.ऋषिकेश घुले,डॉ.प्रियंका आरबडवाड या डॉक्टरांनी सहभाग घेतला .
Post Views: 112
error: Content is protected !!