२ जुलै रोजी मुंबई येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दिमाखदार पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा
२ जुलै रोजी मुंबई येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दिमाखदार पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आयोजित पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दिनांक २ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मुंबई येथील मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान
या ठिकाणी संपन्न होतं आसुन या सोहळ्यास राज्य भरातील पत्रकारांनी मोठ्या संखने उपस्थित रहावे असे अवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर पत्रकारांचा विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जातो. सन २०२४ च्या पुरस्काराचे वितरण बुधवार २ जुलै २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात होत आहे.
मा. खा. शरदचंद्रजी पवार अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या शुभ हस्ते होतं संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.एस.एम. देशमुख मुख्य विश्वस्त, अ.भा. मराठी पत्रकार परिषद, मुंबई हे राहणार आसुन या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ. श्री. नरेंद्रजी जाधव ज्येष्ठ विचारवंत, अर्थतज्ज्ञ, मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार मा. श्री. मधुकर भावे यांना देण्यात येणार असून या प्रसंगी मा. श्री. भरत जाधव ज्येष्ठ नाट्यकर्मी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या प्रसंगी श्री. महेश म्हात्रे आचार्य अत्रे स्मृती, श्री. अभिजित करांडे शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार, श्री. अमेय तिरोडकर पत्रकार प्रमोद भागवत स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार, श्री. पांडुरंग पाटील पत्रकार भगवंतराव इंगळे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, श्री. सर्वोत्तम गावरस्कर नागोजीराव दुधगावकर स्मृती पुरस्कार, श्री. दिनेश केळुसकर दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार, श्रीमती सीमा मराठे सावित्रीबाई फुले स्मृती पत्रकारिता पुरस्कार.श्री. बाळासाहेब पाटील स्वातंत्र्यसैनिक स्व. माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार, श्रीमती शर्मिला कलगुटकर स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार, श्री. भरत निगडे संतोष पवार आदर्श प्रसिध्दी प्रमुख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्य भरातील पत्रकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
मिलिंद अष्टीवकर (अध्यक्ष), किरण नाईक (विश्वस्त) शरद पाबळे (विश्वस्त),
शिवराज काटकर (कार्याध्यक्ष), प्रा. सुरेश नाईकवाडे (सरचिटणीस), मन्सूरभाई शेख
(कोषाध्यक्ष), अनिल वाघमारे (अध्यक्ष डिजिटल मिडिया परिषद), शोभा जयपूरकर (महिला आघाडी प्रमुख)
विशाल परदेशी (मुंबई विभागीय उपाध्यक्ष)
दीपक कैतके मुंबई (विभागीय सचिव) यांच्या सह अखिल भारतीय मराठी पत्रकार
परिषद, मुंबई शाखेचे राजा आदाटे (अध्यक्ष), संजय मिश्कीन (कार्याध्यक्ष)
विनायक सानप (उपाध्यक्ष), दीपक पवार (सरचिटणीस), पांडुरंग म्हस्के (कोषाध्यक्ष)
यांनी केले आहे.
