Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

मनमानी करणाऱ्या आपले सरकार केंद्राची उपजिल्हाधिकारीं यांच्या कडून तपासणी, एका केंद्र चालकावर पोलिसात गुन्हा दाखल तर तीन केंद्र चालकाचे आय डी रद्द  उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांचे सर्वत्र अभिनंदन 

मनमानी करणाऱ्या आपले सरकार केंद्राची उपजिल्हाधिकारीं यांच्या कडून तपासणी, एका केंद्र चालकावर पोलिसात गुन्हा दाखल तर तीन केंद्र चालकाचे आय डी रद्द 

उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांचे सर्वत्र अभिनंदन 

अंबाजोगाई :(प्रतिनिधी)
    सर्वसामान्य गोरगरीब लोकांना शासकीय सुविधांचा सुलभ लाभ घेता यावा म्हणून आपले सरकार पोर्टल द्वारे ऑनलाईन कामे केली जातात या कामासाठी शासनाने निर्धारित रक्कम केलेली आहे. मात्र आपले सरकार केंद्र चालक हे मनमानीपणे अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लूटमार करत असल्याच्या अनेक तक्रारी सोशल माध्यमातून  झांबरे नामक महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी समाज माध्यम व वरिष्ठांपर्यंत तक्रार केल्यामुळे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी व महसूलच्या इतर अधिकाऱ्यांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन पाच केंद्र चालकांची तपासणी करण्यात आल्या नंतर एका केंद्र चालकावर पोलिसात गुन्हा दाखल तर तीन केंद्र चालकाच्या आय डी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दीपक वजाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी
प्रिया झांबरे, NP WOMEN AND CHILD SECURITY WELFARE FOUNDATION चंद्रपूर यांनी आपले सरकार सेवा केंद्राकडून अंबाजोगाई येथे जनतेची पिळवणूक होत असले बाबत स्वत; सेवा केंद्रात जनतेकडून जादा पैशाची मागणी  करण्यात येत असलेबाबत तसेच कार्यालयात खाजगी व्यक्ती कार्यरत असलेबाबत काही सेवा केंद्राचे व तहसिल कार्यालयात खाजगी कर्मचारी काम करत असलेबाबत व्हिडिओ चित्रीकरण करून ते सामाजिक प्रसार माध्यमावर प्रसारित केले होते व त्याबाबत शासनाकडे, मा. विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, मा. जिल्हाधिकारी यांचेकडे व अंबाजोगाईतील तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुषंगाने आज मा. उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून चार पथके तयार करून आपले सरकार केंद्रावर धाडी टाकून कार्यवाही केली.
या तपासणी मध्ये गॅलॅक्झी मल्टीसर्व्हीसेस, तहसिल कार्यालयाजवळ असलेले केंद्र मा. उपविभागीय अधिकारी  दीपक वजाळे यांनी तपासले त्यामध्ये त्यांचेकडे आपले सेवा केंद्र चालविण्याचा कोणताही परवाना दिसून आला नाही.
श्री अमित अरुण माळी यांचे आपले सरकार केंद्र श्री गायकवाड एम एल नायब तहसिलदार यांनी तपासले असता त्यांना सदरील कार्यालयाचा परवाना हा जोगाईवाडीचा असताना ते तहसिल समोरील रस्त्याकडून पाटील चौकाकडे जाणा-या रस्ता येथे दुस-या मजल्यावरून सुरु असलेलेचे दिसून आले.
साई मल्टी सव्हीसेस व अनुराग जगताप यांची आपली सेवा केंद्र श्रीमती बाहेती स्मिता नायब तहसिलदार यांनी तपासणी केली असता त्रुटी दिसून आल्या आहेत.
आर्यन मल्टी सर्व्हीसेस यांचे आपले सरकार केंद्र तपासणीसाठी श्री जिडगे नायब तहसिलदार गेले असता त्यांना हे आपले सेवा केंद्र कुलुप लावल्याचे दिसून आले.
मा. उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली आपले सरकार केंद्र तपासणीत पहीलीच धडक कार्यवाही झाली. एकूण  05 आपले सरकार केंद्र तपासणी अचानकपणे तपासण्यात आल्या नंतर गॅलॅक्झी मल्टीसर्व्हिसेस यांच्याकडे आपले सेवा केंद्र चालविण्याचा कोणताही परवाना दिसून न आल्याने केंद्र चालक मिर मुबीन आली मिरची अर्षद आली याचे विरुद्ध नायब तहसीलदार गणेश जिडगे याचे फिर्यादी वरून अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अमित अरुण माळी रा जोगाईवाडी, बालासाहेब विष्णू दास जगताप रा मुडेगाव, व दत्तात्रय मोहन वीर यांच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या आय डी रद्द करण्यात आली आहे. या सर्व केंद्र चालका विरुध्द परवाना नसताना आपले सरकार केंद्र चालविणे, जनतेकडून जादा पैसे घेणे, मनमानी कारभार करणे अशा अनेक तक्रारी होत्या.  मा. उपविभागीय अधिकारी यांनी स्वत: रस्त्यावर उतरत अचानक तपासण्या केल्या मुळे एकीकडे केंद्र चालकाचे धाबे दनानले असताना नागरिकातुन मात्र या कार्यवाहि बद्दल उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांचे अभिनंदन होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!