Skip to content
बीड येथिल स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडला 19 लाख 25 हजार रुपयाचा ऐवज जप्त

अंबाजोगाई
बीड येथिल स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील धर्मापुरी ते पानगाव रोडवर अवैद्य वाळूची वाहतूक करणारा हायवा पकडून 2 जनावर गुन्हा दाखल केला आसुन त्यांच्या कडून 19 लाख 25 हजार रुपयाचा ऐवज जप्त केला आहे.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशानुसार पो उ नि सुशांत सुतळे, हे कॉ रामचंद्र केकान, हे कॉ मारुती कांबळे, हे कॉ विष्णु सानप, एन पी सी गोविंद भताने, पो कॉ सचिन आंधळे, चालक पोहे कॉ अतुल हराळे यांचे पथक 10/07/2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान परळी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना या पथकाने धर्मापुरी ते पानगाव रोडच्या डाव्या बाजूस उभा असलेला व चोरून वाळूची वाहतूक करणारा एम एच 46 ए आर 7442 क्रमांकाचा हायवा पकडला. या वेळी गाडी चालक व मालक फरार झाले असून या दोघांवर परळी ग्रामीण पोलिस ठाणे येथे गु र न 304/2025 कलम 303(2), 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आसुन त्यांच्या कडून हायवा व वाळू असा एकूण 19 लाख 25 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Post Views: 460
error: Content is protected !!