Skip to content
अंबाजोगाईत सरोजनी (राणी ताई)देशपांडे यांचे बहारदार गायन संपन्न.

++++++++++++++++++
(अंबाजोगाई प्रतिनिधी)
अंबाजोगाईच्या देशपांडे गल्लीतील “स्वररंग” संगीत विद्यालयात गुरू पोर्णिमेचे औचित्य साधून रविवारी दि.१३ जुलै २०२५ रोजी अंबाजोगाईतील प्रख्यात गायिका सरोजिनी (राणीताई) देशपांडे (वडगावकर) यांचे बहारदार गायन संपन्न झाले. त्यांनी जोग रागामधील मध्यलयीतील ख्याल साजन मोरे घर आये सादर केला. आकर्षक राग मांडणी विविध लयीतील आलाप व ताना सह अत्यंत दमदार व खड्या आवाजात त्यांनी आपले गायन सादर केले. त्यांना तबला संगत प्रा. श्री रत्नदीप शिगे तर हार्मोनियम संगत प्रा. श्री शैलेश पुराणिक यांनी केली.
कार्यक्रमाची सुरुवात अंबाजोगाईतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कलावंत श्री उल्हास दादा पांडे संस्कार भारती अंबाजोगाई समितीच्या अध्यक्षा सौ. लताताई पत्की प्रमुख अतिथी कलावंत सौ.सरोजिनीताई देशपांडे व शैलेश पुराणिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदन सादर केली. अध्यक्षस्थानी असलेले उल्हास दादा यांनी विद्यार्थ्यांना रियाजचे महत्त्व सांगितले व आपला केलेला रियाज इतरांना सांगू नये अशा सूचनाही केल्या औपचारिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश पुराणिक यांनी तर आभार डॉ. नितीन पोतदार यांनी व्यक्त केले औपचारिक कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी गुरुवंदना सादर केली त्यानंतर कु. शताक्षी घायाळ हिने राग भिमपलास, कु. इरा कोदरकर हिने राग कल्याण, कु.अरिया पटेकर हिने राग दुर्गा, कु. स्वराली पुराणिक हिने राग बागेश्री, कु. वैभवी देशपांडे हिने राग असावरी, डॉ. संदीप जैन यांनी राग वृंदावनी सारंग, डॉ. नितीन पोतदार यांनी राग तिलक कामोद, श्री वैजनाथ डिगे यांनी नारायण रमा रमणा हे नाट्यगीत व अभिर गुलाल हा अभंग गायला त्यानंतर लहान मुलांनी चला हो पंढरी जाऊ हा संत तुकारामांचा अभंग सामूहिक रित्या सादर केला. कु.श्रावणी कुलकर्णी हिने राग जयजयवंती, सौ मंजुषा देशमुख यांनी राग मिया मल्हार सौ. वैशाली विडेकर यांनी राग मुलतानी, श्री सतीश भोसले यांनी ठाई ठाई विठ्ठल व टाळ बोली चिपळीला हे गीते सादर केली, श्री अनंतराव मुळे यांनी राग कल्याण गायला सौ आशालता कलमे यांनी रघुपति राघव गजरी गजरी हे गीत गायले, श्री बळीराम उपाडे यांनी जब दीप जले आना हे गीत सादर केले कु. यशश्री गुट्टे हिने राग दरबारी कानडा गायला. यानंतर श्री भागवत पाठक बासरी व श्री शैलेश पुराणिक गायन यांनी जुगलबंदीतून राग देस सादर केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. यशश्री गुट्टे हिने केले. श्री निलेश मस्के श्री बंकट बैरागी यांनी तबला संगत केली तर कु. इरा कोदरकर. व स्वराली पुराणिक हार्मोनियम संगत केली. कार्यक्रम यशस्वी करण्यात मध्ये श्री बंकट कुमार बैरागी, कु. श्रावणी कुलकर्णी, कु.यशश्री गुट्टे, कु, वैभवी देशपांडे, डॉ. संदीप जैन, डॉक्टर नितीन पोतदार, प्रा. श्री महादेव माने, कपिल देशपांडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास डॉ. अशोक पत्की सर ,श्री पांडुरंगजी देशपांडे सर ,श्री किरणदादा कोदरकर, श्री अशोककाका देशपांडे, श्री लिंबाजी गुट्टे, श्री घायाळ सर इत्यादी मान्यवर व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
Post Views: 85
error: Content is protected !!