Skip to content
*मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू; अंबाजोगाई तालुक्यातील देवाळा येथिल घटना*

अंबाजोगाई :
अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे मारहाण झालेल्या अविनाश गोरोबा सगट (वय २५) या युवकाचा बुधवारी (दि. १६ जुलै) रोजी रात्री उशिरा स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या विषयी प्राप्त माहितीनुसार आंबेजोगाई तालुक्यातील देवळा येथील रहिवासी अविनाश गोरोबा सगट हा दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा काल रात्री मृत्यू झाला.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीसात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
Post Views: 420
error: Content is protected !!