Skip to content
*शेपवाडीचे माजी सरपंच विष्णू शेप यांची अंबाजोगाई भाजपा तालुका उपाध्यक्षपदी निवड*

*(अंबाजोगाई/प्रतिनिधी)*– शेपवाडीचे माजी सरपंच आणि अंबाजोगाई शहरातील एक प्रतिष्ठित मोठे व्यापारी असलेल्या विष्णुपंत शेप यांची अंबाजोगाई भाजपा तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
अंबाजोगाई शहरातील मोंढा मार्केट मधील स्टीलचे सर्वात मोठे व्यापारी व टाटा स्टीलचे डीलर तालुक्यातील शेपवाडी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रामपंचायतीचे तीन वेळा सरपंच राहिलेले, शहरातील भगवानबाबा चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भव्यदिव्य अशा ड्रीम सिटी तथा सटवाजीनगरचे मालक, शेपवाडी-अंबाजोगाईसह पंचक्रोशीतील अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व असणारे सर्वांचे लाडके तात्या राजकारणात आल्यापासून आजतागायत मुंदडा कुटुंबाचे अगदी एकनिष्ठ तथा अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे विष्णुपंत उमाजी शेप यांची नुकत्याच नव्याने निवड झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारणीमध्ये तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल मंत्री पंकजा मुंडे, माजी खा.डॉ. प्रीतम मुंडे, आ.नमिता मुंदडा, भाजपा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते तथा चेअरमन पनगेश्वर कारखाना, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य अक्षय मुंदडा, बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष संतोष भगत, मोरेवाडी जि.प.सदस्य बालासाहेब शेप, अखंड हिंदूराष्ट्र संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा ग्रामविकास-पंचायतराज विभागाचे मराठवाडा संयोजक आणि नरेंद्र मोदी विचारमंचाचे बीड जिल्हाध्यक्ष पत्रकार सुनील सिरसाट, KSBL बिल्डर ग्रुप, गोवा येथील प्रसिद्ध बील्डर डी.के.पाटील, शेपवाडी ग्रामपंचायतीत 13 पैकी तब्बल निवडून आलेले 9 ग्रामपंचायत सदस्यांसह शहरातील अनेक प्रतिष्ठित पुढारी व्यापारी व इतरही स्तरातील मान्यवरांनी झालेले या निवडीबद्दल विष्णुपंत शेप यांचे अभिनंदन केले आहे….!
Post Views: 129
error: Content is protected !!