मारुति सुझुकीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन Ertiga भारतात लाँच, 6 एअरबॅग्स, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
मारुति सुझुकीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन Ertiga भारतात लाँच, 6 एअरबॅग्स, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
मुंबई
मारुति सुझुकीने आपली लोकप्रिय एमपीव्ही एर्टिगाचं 2025 मॉडेल भारतात लाँच केलं आहे. या नव्या मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9,11,500 रुपये आहे. कंपनीने या नव्या एर्टिगामध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले असून, सर्व व्हेरिएंट्समध्ये आता 6 एअरबॅग्स स्टँडर्ड देण्यात आले आहेत.
यापूर्वी लोअर व्हेरिएंट्समध्ये फक्त दोन एअरबॅग्स, तर टॉप मॉडेल्समध्ये 4 एअरबॅग्स उपलब्ध होते. सुरक्षेला प्राधान्य देत कंपनीने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती –
2025 मारुति सुझुकी एर्टिगा चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे: LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus. पेट्रोल-मॅन्युअल सर्व चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, आणि त्याची किंमत 9.12 लाख ते 12.01 लाख रुपये आहे. पेट्रोल-ऑटोमॅटिक पॉवरट्रेन उच्च श्रेणीतील तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत 11.61 लाख ते 13.41 लाख रुपये आहे. हे दर तुलनात्मक पेट्रोल-मॅन्युअल व्हेरिएंट्सपेक्षा 1.40 लाख रुपये जास्त आहेत. खाली सर्व व्हेरिएंट्सच्या एक्स-शोरूम किंमती दिल्या आहेत:
-2025 मारुति सुझुकी एर्टिगा LXi: 9,11,500 रुपये
-2025 मारुति सुझुकी एर्टिगा VXi: 10,20,500 रुपये
-2025 मारुति सुझुकी एर्टिगा VXi CNG MT: 11,15,500 रुपये
-2025 मारुति सुझुकी एर्टिगा ZXi MT: 11,30,500 रुपये
-2025 मारुति सुझुकी एर्टिगा VXi AT: 11,60,500 रुपये
-2025 मारुति सुझुकी एर्टिगा ZXi+ MT: 12,00,500 रुपये
-2025 मारुति सुझुकी एर्टिगा ZXi CNG MT: 12,25,499 रुपये
-2025 मारुति सुझुकी एर्टिगा ZXi AT: 12,70,500 रुपये
-2025 मारुति सुझुकी एर्टिगा ZXi+ AT: 13,40,500 रुपये
नवीन फीचर्स –
2025 मारुति सुझुकी एर्टिगामधील नवीन फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर आता सर्व मॉडेल्समध्ये 6 एअरबॅग्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे सुरक्षितता वाढली आहे. याशिवाय, यामध्ये खालील फीचर्स जोडण्यात आले आहेत: टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (फक्त टॉप मॉडेलमध्ये)
-PM 2.5 फिल्टर (फक्त टॉप मॉडेलमध्ये)
-दुसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी 2 USB-C फास्ट चार्जर (VXi आणि त्यावरील व्हेरिएंट्समध्ये)
-दुसऱ्या रांगेसाठी AC व्हेंट्स (VXi आणि त्यावरील व्हेरिएंट्समध्ये)
-तिसऱ्या रांगेसाठी AC व्हेंट्स आणि अॅडजस्टेबल फॅन स्पीड (VXi आणि त्यावरील व्हेरिएंट्समध्ये)
-तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी दोन USB-C फास्ट चार्जर (ZXi आणि ZXi+ मॉडेल्समध्ये)
-7x 3-पॉइंट सीटबेल्ट्स आणि अॅडजस्टेबल हेडरेस्ट्स
-नवीन रूफ स्पॉइलर
इंजन आणि पॉवर
नव्या 2025 एर्टिगामध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजन देण्यात आले आहे, जे 102 PS पॉवर आणि 139 Nm पीक टॉर्क जनरेट करते. CNG व्हेरिएंटमध्ये हेच इंजन 99 PS पॉवर आणि 122 Nm टॉर्क देते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले, तर पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ही एमपीव्ही 20.51 kmpl (मॅन्युअल) आणि 20.30 kmpl (ऑटोमॅटिक) मायलेज देते, तर CNG व्हेरिएंटमध्ये 26.11 km/kg मायलेज मिळते.
दरम्यान, 2025 मारुति सुझुकी एर्टिगा आपल्या नवीन फीचर्स, सुधारित सुरक्षितता आणि किफायतशीर किंमतीमुळे कुटुंबांसाठी एक उत्तम पर्याय आहे. ही एमपीव्ही व्यावहारिकता, आराम आणि इंधन कार्यक्षमतेने परिपूर्ण आहे, ज्यामुळे ती भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही आहे.
