Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

फोन पे वरून 84 हजार रुपयाची जबरी चोरी आंबाजोगाई शहर पोलिसांनी आरोपीस अवघ्या दोन तासात केले अटक 

फोन पे वरून 84 हजार रुपयाची जबरी चोरी आंबाजोगाई शहर पोलिसांनी आरोपीस अवघ्या दोन तासात केले अटक 

 अंबाजोगाई 

     फोन पे वरून 84 हजार रुपयाची जबरी चोरी  केल्याप्रकरणी आंबाजोगाई शहर पोलिसांनी अविनाश देवकर व अझर पठाण या दोन आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करून त्यांच्याकडून 74 हजार रुपये हस्तगत केल्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे 

   या विषयी प्राप्त माहिती अशी की अंबाजोगाई येथील कोळ कानडी येथिल रहिवाशी असलेले व गॅरेज चा व्यवसाय करणारे सोमनाथ मदन ढगे यांचे अंबाजोगाई शहरातील रहिवासी असलेले अविनाश शंकर देवकर (वय 32, रा. वडारवाडा) व अजहर अब्दुल रहमान पठाण (वय 32, रा. पेन्शनपुरा) या दोघांनी मिळून 84 हजार 9/- रुपये PhonePe वरून जबरी चोरी  करून जबरदस्तीने काढून घेतल्यामुळे सोमनाथ ढगे यांच्या फिर्यादीवरून आंबेजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये 22 जुलै 2025 रोजी अविनाश शंकर देवकर (वय 32, रा. वडारवाडा, अंबाजोगाई) अजहर अब्दुल रहमान पठाण (वय 32, रा. पेन्शनपुरा, अंबाजोगाई) या दोघाजनाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 377/2025 भा.दं.सं. कलम 309(4), 3(5) BNS नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.  

    हा गंभीर गुन्हा लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मा. श्री नवनीत कावत साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रवी कुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार: श्रीकृष्ण वडकर, मनोज घोडके, रवी कुमार केंद्रे, हनुमंत लाड, हनुमंत चादर, पांडुरंग काळे, भागवत नागरगोजे यांनी  तात्काळ कारवाई करत अवघ्या 2 तासांत दोन्ही आरोपींना अटक केली व फिर्यादीकडून फसवलेले ₹74,009/- रुपये हस्तगत केले.  

      अंबाजोगाई शहर पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे 

    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!