Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

ईसार पावतीवरील बनावट सह्याच्या आधारे दिलेला दाव्यातील मनाई हुकुम न्यायालयाने फेटाळला

ईसार पावतीवरील बनावट सह्याच्या आधारे दिलेला दाव्यातील मनाई हुकुम न्यायालयाने फेटाळला

आंबजोगाई (प्रतिनिधी)

    ईसार पावतीवर बनावट सह्या करून त्या आधारे दिलेला दाव्यातील मनाई हुकुम आंबजोगाई दिवाणी न्यायालयाने फेटाळला असून बिरू थाटकर यांचा दावा मंजूर केला आहे.

     या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, वादी बिरु ज्ञानोबा हजारे रा. अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई. जि. बीड यांनी मे. दिवाणी न्यायाधिश साहेब वरिष्ठ स्तर अंबाजोगाई येथे स्पे.दि.दा.क्र २८/२०२४ हा दि. २५/०४/२०२४ रोजी बिरु हजारे विरुध्द भाग्यश्री दिलीप विर्धे व प्राची किरकोळ अंकीता पोतदार, केदार विर्धे , सुनीता मुडेगावकर व बिरु अशोक तोडकर रा धनगर गल्ली अंबाजोगाई यांच्या विरुध्द रक्कम रु. १००/- चे बॉन्ड पेपरवर लिहण्यात आलेल्या वादग्रस्त मिळकत नगरपालिका अंबाजोगाई हह्मीतील धनगरगल्ली रविवार पेठ येथील घर मिळकत  सन २०१२ मध्ये खरेदी करण्याचा ठराव मयत दिलीप राजाराम विधे सोबत रक्कम रु. १०,००,०००/- मध्ये केला व त्यापैकी रु. ८,००,०००/- नगदी दिले व रक्कम रु. २,००,०००/- सन २०२३ मध्ये देऊन खरेदीखत करण्याचे ठरले व वेगळी रशीदपावती करुन दिली इत्यादी मजकुर बाबत मयताचे वारसांनी व सदर मिळकतीचे रजिस्टर खरेदीखत करुन घेणार बिरु थाटकर यांना प्रतिवादी कडुन मयत दिलीपचे वारसांना सदर कराराचे पावीत्र लक्षात घेवुन खरेदीखत वादीला करुन द्यावे असा करार पुती मालकी घोषणा व चिरकाल मनाई हुकुम चा दावा दिला त्यामध्ये प्रतिवादी हजर होवुन त्यांनी दाव्याचा लेखी जवाब दावा व अर्जाचा से व प्रतिदावा दाखल करुन स्पष्टपणे बाब नमुद केली की मयत दिलीप यांनी दाव्यात दाखल ईसार पावती करुन दिलेली नाही. रशीदपावतीही करुन दिलेली नाही व सदरील ईसारपावतीवर मयत दिलीप विधे यांच्या बोगस सह्या आहेत असे सांगितले.       दोन्ही बाजुचा युक्तीवाद व पुरावा ऐकुण व कागदपत्राचा पुरावा ग्राह्या धरुन ईत्यादी प्रतिवादीचा प्रतिदावा व प्रतिवादीचे वकील अॅड श्रीनीवास व्ही कुलकर्णी (पाटोदकर) यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन वादीचा ऑर्डर ३९ रुल १ व २ नुसार नि.क्र. ५ वादीचा ताबा असल्याबाबतचा अर्ज फेटाळला व प्रतिवादी क्र. ६ यांचा ताबा कायम धरुन वादीने प्रतिवादीच्या शांततामय कब्जे उपभोगात वादग्रस्त मिळकतीमध्ये हरकत व अडथळा करु नये अशा प्रकारच्या तात्पुरता मनाई हुकुम प्रतिवादीच्या हक्कात नि. १५ प्रमाणे मंजुर केला व सदर आदेश मंजुर करतेवेळी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचे न्याय निवाडे ग्राह्य धरले सदरचे न्यायालय डी.एम. चामले साहेब यांच्या न्यायालयाने न्यायनिर्णय दिला असून या न्यायनिर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे सदरचे न्याय निर्णय कामी प्रतिवादीच्या वतीने अॅड श्रीनीवास व्ही कुलकर्णी यांने काम पाहीले व त्यांना ॲड. वैजनाथ वांजरखेडे आणि अॅड जे.जे. विर्धे यांनी सहकार्य केले यामध्ये त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!