Skip to content
*इनरव्हिल क्लब ऑफ अंबाजोगाई अध्यक्षा सुरेखा सिरसट ‘बेस्ट मोटिव्हेट प्रेसिडेंट ॳॅवॉर्डने’ सन्मानित.*

======================
प्रतिनिधी, अंबाजोगाई
पुणे, खडकवासला येथे
डिस्ट्रिक्ट असेम्ब्ली कौशिकामध्ये एका शानदार कार्यक्रमात इनरव्हिल क्लब ॴॅफ अंबाजोगाईला विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. शोभनाजी पालेकर, श्रीमती चारूलता चिंचणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भव्य कार्यक्रमात अंबाजोगाई इनर व्हिल क्लबला विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
पुणे येथे ४१ वी इनरव्हिल डिस्ट्रिक्ट असेम्ब्ली कौशिका दि.१९ व २० जुलै रोजी अत्यंत दिमाखात संपन्न झाली. डिस्ट्रिक्ट मधील प्रत्येक क्लबचा त्यांनी वर्षभरात केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करण्याचा हा सोहळा असतो.
या वर्षी इनरव्हिल क्लब ॴॅफ अंबाजोगाईच्या कार्याचे कौतुक सोहळ्यात खूप कौतुक झाले.
इनर व्हिल क्लब अंबाजोगाईला यावर्षी तीन विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यामध्ये प्रेस्टिजिअस ॳॅवॉर्ड अंबाजोगाई अध्यक्षा सुरेखा सिरसट यांना ‘बेस्ट मिस पॅसिनेट प्रेसिडेंट’ ,एक्सलंट ॳॅवॉर्ड फॉर हॅपी व्हिलेज प्रोजेक्ट ट्रॉफी ,थर्ड रॅंक मॅक्झिमम अटेंडंस् इन डिस्ट्रिक्ट इव्हेंटस्, जॉइन द चाईल्ड ॳॅण्ड युथ डेव्हलपमेंट , वुमेन्स एम्पावरमेंटचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
क्लबच्या सदस्यां करिता याप्रसंगी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स मिट स्पर्धा येथे घेण्यात आल्या त्यामध्ये अंबाजोगाई क्लबला दोन सुवर्ण ,एक कास्य ,एक ब्रॉंझ असे चार मेडल्स मिळाले.
यावेळी फॉरेजिन लॅंग्वेज ॴॅनलाइन एज्युकेशन प्रोजेक्ट कमिटीने सन्मानपत्र देऊन सन्मान केला .
इनरव्हिल क्लब ॴॅफ अंबाजोगाईने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेतल्याने सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
क्लब पदाधिकारी आणि क्लब मेंबर्सची साथ व विविध व्यक्तींनी या सामाजिक कार्यात मदतीचा हात दिल्याने हे यश मिळाले आहे असे इनरव्हिल क्लब ॴॅफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा सुरेखा सिरसट यांनी विशेष नमूद करून त्यांना धन्यवाद दिले आहेत.
Post Views: 287
error: Content is protected !!