Skip to content
अलखैर पतसंस्थेच्या वतीने पिग्मी एजंट शेख अन्वर यांच्या हस्ते ऑटोच्या चावीचे वितरण

अंबाजोगाई/प्रतिनिधी
शहरात गेल्या 20 वर्षापासून अखंडितपणे सर्व सामान्य व छोट्या व्यवसायिकांच्या सेवेत सदैव तत्प असणार्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मुराबा योजनेतंर्गत शहरातील अॅटो चालक शेख मकबूल आबेद हुसेन यांना बजाज कंपनीचा रि डिझेल अॅटो देण्यात आला आहे. या अॅटोच्या चावीचे वितरण अलखैर पतसंस्थेचे पिग्मी एजंट असलेले शेख अन्वर आबेद हुसेन यांच्या हस्ते त्यांचा भाचा पठाण वसिम खय्युमखान यांना देण्यात आली. या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारुक सर, संचालक शेख मुजाहेद, व्यवस्थापक सय्यद रउफ आदी उपस्थित होते. अलखैर परिवार हा सतत शहरातील व तालुक्यातील जे तरुण बेरोजगार आहेत किंवा ज्यांच्याकडे कौशल्य आहे आणि काम करण्याची व मेहनत करण्याची तयारी आहे अशांना मदतीचा हात म्हणून जे काही सहकार्य लागणार आहे त्या संदर्भात एक पाउल पुढे टाकण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून या अॅटोचे वितरण करण्यात आले.
Post Views: 347
error: Content is protected !!