परळी तालुका पुन्हा एकदा चर्चेत –अस्वलंबा येथे परप्रांतीय युवतीवर सामूहिक बलात्कार
परळी तालुका पुन्हा एकदा चर्चेत –अस्वलंबा येथे परप्रांतीय युवतीवर सामूहिक बलात्कार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सिकंदराबाद येथील राहिवासी असलेल्या 20 वर्षीय युवतीवर 8 ऑगस्ट च्या रात्री एका महिलेच्या संगणमताने सामूहिक बलात्कार केल्याची घटना परळी तालुक्यातील अस्वलंबा येथे घडल्याने एकच खळबळ उडाली असून यां प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की,
8 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.30 ते 9 ऑगस्ट 2025 चे 2 वाजण्याच्या सुमारास सिकंदराबाद येथिल गोल्डदरी येथिल राहिवासी असलेली पीडित महिलाही परळी येथिल रेल्वे स्टेशन वर एकटी असल्याचे पाहून पूजा नावाच्या महिलेने तिला काम देतो असे म्हणून रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले व मोटार सायकल वर बसवून आरोपी सतीश व मोहसीन यांनी तिला मध्ये बसवून परळी तालुक्यातील अस्वलंबा शिवारातील एका शेतातील घरात पत्राच्या शेडमध्ये नेले व आरोपी भागवत यांचे सह सतीश मोहसीन व भागवत यांनी मारहाण करून तिला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन जबरदस्तीने बलात्कार केला त्या तिघांना बलात्कार करता यावा म्हणून आरोपी पूजा हिने मदत केली म्हणून सर्व आरोपी विरुद्ध पीडितेने अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 258/ 2025 कलम 64, 70, 76, 115, (2),(3),3(5) भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी शिंदे हे करत आहेत
Post Views: 157