Tuesday, September 9, 2025
ताज्या घडामोडी

अंबाजोगाई व परिसरात अवैद्य दारुचा गुता चालविणाऱ्या पाच धाबा व हॉटेल चालकाविरुध्द गुन्हे दाखल

अंबाजोगाई व परिसरात अवैद्य दारुचा गुता चालविणाऱ्या पाच धाबा व हॉटेल चालकाविरुध्द गुन्हे दाखल

 अंबाजोगाई (प्रतिनिधी)

     अंबाजोगाई व परिसरात अवैद्य दारुचा गुता चालविणाऱ्या पाच धाबा व हॉटेल वर शहर पोलिसांनी धाडी टाकून चालकाविरुध्द पोलिसात गुन्हे दाखल केल्याने चोरून दारू विकणाऱ्या धाबे व हॉटेल चालकांचे धाबे दनाणले आहेत.
    मा. श्री नवनीत कौवत, पोलीस अधिक्षक साहेब बौड, मा. श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधिक्षक साहेब अंबाजोगाई, सहा. पोलीस अधिक्षक श्री ऋषीकेश शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सपोनि कांबळे, पोउपनि शिंदे, पोउपनि पवार, पोउपनि गोड पोह/१६७१ गायकवाड, पोह/१४४२ शेख, पोअं/१२५६ ढोबळे, पोह/१४८५ वडकर, पोअं/५०९ लाड, पोअं/१९८० वाव्हळे, पोअं/२०२० नागरगाजे, पोअं/८९० चादर यांनी काल दि. २८/०८/२०२५ रोजी अंबाजोगाई शहरात व बायपास रोडवर हॉटेल ढाब्या मध्ये अवैद्यरित्या विना परवाना बेकायदेशीर रित्या दारा पिण्याकरीता जागा व सुविधा उपलब्ध करून देऊन दारुचा गुत्ता चालविणारे  हॉटेल योगेश्वरी चालक श्रीधर रामराव फड वय ४२ वर्षे व्यावसाय हॉटेल चालक रा. माळीनगर अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड, न्यूगार्डन धाया मालक वैभव वैजेनाथराव बावळे वय ३९ वर्षे व्यावसाय होटेल चालक रा. बलुत्याचा मळा अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड, हॉटेल ७/१२ धावा मालक संतोष बबनराव मुदगुलकर वय ४१ वर्षे व्यवसाय हॉटेल चालक रा. कोठाड गल्ली अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड, बसस्थानक अंबाजोगाई येथील हॉटेल मराठा खानावळ मालक वसीमखान अनवरखान पठाण वय ३६ वर्षे व्यावसाय हॉटेल चालक रा. मंगळवार पेठ अंबाजोगाई ता. अंबाजोगाई यांचेवर कारवाई करून पोलीस स्टेशनला गुरन ४३४/२०२५ कलम ६८ (अ) (ब) महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

    तसेच रिंगरोडवरील हॉटेल स्वाद धावक मालक पांडूरंग विजय देशमुख वय ४३ वर्षे व्यावसाय हॉटेल चालक रा. जुना पेंडगाव रोड परभणी ह.मु प्रशांतनगर अंबाजोगाई हा दारु पिण्याकरीता जागा उपलब्द करून देऊन देशी दारुची विक्री करीत असतांना मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द ४३३/२०२५ कलम ६५ (ई), ६८ (अ) (ब) महाराष्ट्र दारु बंदी कायदा प्रमाणे गुन्हा दिनांक २८/०८/२०२५ रोजी दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!